crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
डोंबिवली येथून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेच्या मुख्याध्यापकानेच ६ वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना उघडकीस येथेच परिसरातील नागरिकनांनी आणि पालकांनी मुख्याध्यापकाला पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आणि फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.
Crime News: कर्ज मंजूर करुन देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ८९ लाखांची फसवणूक; CA ला अटक
नेमकं काय घडलं?
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिल्हा परिषदेची एक शाळा आहे. त्या शाळेत पीडित ६ वर्षीय चिमुकली शिक्षण घेत आहे. याच शाळेतील मुख्याध्यापक महेंद्र खैरनार याने मुलीसोबत गैरकृत्य केल्याची बाब समोर आली. शाळेतील एका जबाबदार व्यक्तीनेच असे गैरकृत्य केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. हे घटना समोर येथेच परिसरातील नागरिक आणि पालकांनी शाळेकडे धाव घेतली आणि आरोपी महेंद्र खैरनार याला पकडले. संतप्त नागरिकांनी कोणतीही दिरंगाई न करता आरोपीला मानपाडा पोलिसांच्या हवाली केले.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मनसेने आरोपी मुख्याध्यापकांविरोधात त्वरित गुन्हा दाखल करण्याची आणि त्याला फाशीची शिक्षा देण्याची तीव्र मागणी केली आहे. नागरिकांच्या मागणीनंतर आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मानपाडा पोलिसांनी त्वरित कारवाई केली आहे. त्यांनी आरोपी महेंद्र खैरनार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या आधीही असे केले
आरोपी मुख्याध्यापक महेंद्र खैरनार याने सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये असाच प्रकार केला होता. मात्र त्यावेळी त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नव्हती. आताच्या या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि कल्याण ग्रामीण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलीस आता काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत.
मृत घोषित झालेली महिला सापडली जिवंत
मुंबईतील विक्रोळी परिसरातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एक महिला जिला मृत घोषित करण्यात आले होते. ती कळव्यात जिवंत सापडली आहे. या महिलेचे नाव मनीषा सराटे असे आहे. मनीषा ही कन्नमवार नगर, विक्रोळी येथील रहिवासी असून ती गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता होती, असे सांगण्यात येत आहे. तिच्या कुटुंबियांना तिचा मृत झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्या तरुणीचा शोध घेण्यासाठी विक्रोळी गाठले. तिथे पोलिसांची मदत घेण्यात आली. तेव्हा तपासात ती जिवंत असल्याचे समोर आले आहे.
विमानाच्या टॉयलेटमध्ये प्रवाशाने ओढली सिगारेट, पोलिसांनी घेतले ताब्यात