Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इन्स्टाग्रामवर झाली ओळख नंतर जवळीक वाढवली अन् हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला; व्हिडिओ, फोटोही काढले

वैभव गंगासागर विजय पाटील असे आरोपीचे नाव आहे. वैभव पाटील हा जलसंपदा विभागात उपविभागीय अभियंता आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होताच तो फरार झाल्याची माहिती सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 01, 2026 | 08:19 PM
आंघोळ करतानाचे 'ते' फोटो व्हायरल करण्याची तरुणीला धमकी; तब्बल 9 वर्षे अत्याचार केले अन् नंतर...

आंघोळ करतानाचे 'ते' फोटो व्हायरल करण्याची तरुणीला धमकी; तब्बल 9 वर्षे अत्याचार केले अन् नंतर...

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता
इन्स्टाग्रामवरून प्रेमाचे जाळे टाकत विवाहित महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

वैभव गंगासागर विजय पाटील असे आरोपीचे नाव आहे. वैभव पाटील हा जलसंपदा विभागात उपविभागीय अभियंता आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होताच तो फरार झाल्याची माहिती सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी दिली आहे. वैभव याने पीडित महिलेचा विश्वास संपादन करत अश्लील व्हिडिओ तयार केले आणि त्याच व्हिडिओच्या आधारे तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ वारंवार ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार शहरात उघडकीस आला आहे.

या प्रकरणात ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार, जुलै २०२५ मध्ये vaibhavp.27 या इन्स्टाग्राम आयडीवरून पीडितेला फ्रेंड रिक्वेस्ट आली. वैभव गंगासागर विजय पाटील असे नाव सांगत आरोपीने सुरुवातीला साध्या गप्पांमधून संवाद वाढवला. काही दिवसांतच त्याने पीडितेचा मोबाईल क्रमांक घेत व्हॉट्सअॅपवरून सातत्याने संपर्क ठेवत विश्वास संपादन केला.

फॉर्च्युनर कारमधून हॉटेलमध्ये नेलं…

१६ जुलै रोजी आरोपीने उल्कानगरी चौकात भेटीस बोलावले. कॉफी घेऊ असे सांगत फॉर्च्युनर कारमधून रोजेबाग परिसरातील एका हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमध्ये नेऊन त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नाहीतर या अत्याचाराचे त्याने फोटो आणि व्हिडिओही काढले.

सुट्टीच्या नावे महिलेवर अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत, सुट्टीच्या नावाने कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने एका महिला कर्मचाऱ्याला ‘तू खूप सुंदर आहेस, मला आवडतेस, मला खुश कर, दोन दिवस काय दहा दिवस सुट्या देईन आणि पगारही कापणार नाही’, असे म्हणत लैंगिक शोषण केल्याची घटना बांभोरीतील अॅस्टोमो कंपनीत घडली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून जनार्दन नामक अधिकाऱ्यावर धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आजारी मुलीच्या शुश्रुषेसाठी सुटी मागितली असता हा प्रकार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

धक्कादायक ! ‘गाडीवर फिरवून आणतो’ म्हणत 8 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधमाने निर्जनस्थळी नेलं…

Web Title: Sexual assault of a woman under the guise of friendship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • Abused Case
  • crime news
  • Woman Harassments

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.