CRIME (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
उत्तर प्रदेशातील रामनगरी अयोध्येतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका शिपायावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. एक तरुणी पोलीस ठाण्यात थेट रडत रडत पोहोचली आणि आपल्या मनातील संपूर्ण गोष्ट सांगितली. पीडितेच्या तक्रारीवर महिला पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अनेक महिने उलटूनही शिपायाला अटक झालेली नाही. यामुळे पीडित तरुणी त्रस्त आहे.
भीषण अपघात; ट्रॅक्टर अन् डिव्हायडरला धडकल्याने दोन दुर्घटना, ४ जणांचा मृत्यू
तरुणीने पोलिसांना काय सांगितले?
तरुणी ही मूळची बाराबंकीची रहिवासी आहे. सध्या ती राम जन्मभूमी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेढी बाजारात राहते. डिसेंबर २०२१ मध्ये टेढी बाजारातील एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आणि रामललाचे दर्शन घेण्यासाठी ती आली होती. तेव्हा ती आपल्या मैत्रिणीसोबत तिच्या खोलीत एक महिना राहिली. या काळात हॉस्टेलमध्ये शिपाई रितेश तिवारी याच्याशी भेट झाली. हळूहळू त्यांच्यात बोलणे सुरू झाले. दोघांमध्ये जवळीक वाढली. शिपायाने लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. यावर पीडितेने लग्नापूर्वी काहीही करण्यास नकार दिला. मात्र शिपायाने तरुणीचे काहीही ऐकले नाही आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. २०२२ पासून लग्नाचे आमिष दाखवून तो शारीरिक संबंध बनवत राहिला. त्यांनतर पीडितेने वारंवार लग्नासाठी आग्रह केल्यावर त्याने लग्नास नकार दिला. त्रस्त होऊन पीडितेने गुन्हा दाखल केला आहे.
तीन महिने होऊनही अद्याप अटक नाही
३ जानेवारी २०२५ रोजी महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आतापर्यंत आरोपीची अटक झालेली नाही. त्यानंतर पीडितेने ६ मे रोजी अटकेसाठी आयजी कार्यालयाला अर्ज दिला. परंतु तिथूनही निराशा हाती लागली. आरोपी शिपायी मूळचा कानपूरच्या रहिवासी आहे आणि सध्या तो फरार असल्याचे सांगितले जात आहे. आज पुन्हा एकदा पीडितेने पोलिसांना आरोपीला अटक करण्याची विनंती केली आहे.
एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा