Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाला मुलगा; वाटेतच रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!

शहीद पित्याचे पार्थिव घेऊन मुलगा गावी निघाला होता... मात्र अंतिम निरोप देण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. पूर्वांचल एक्सप्रेसवेवर रुग्णवाहिकेला अज्ञात वाहनाने दिलेल्या भीषण धडकेत शहीदाच्या मुलासह चौघांचा मृत्यू झाला आणि एका कुटुंबाच्या आनंदाची जागा क्षणात आक्रोशाने घेतली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 04, 2026 | 01:55 PM
Accident News: शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाला मुलगा; वाटेतच रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!

Accident News: शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाला मुलगा; वाटेतच रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!

Follow Us
Follow Us:
  • शहीद पित्याचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला भीषण अपघात
  • मुलगा, भाऊ, पुतण्या आणि चालक अशा चौघांचा मृत्यू
  • पूर्वांचल एक्सप्रेसवेवर अज्ञात वाहनाने दिली जोरदार धडक
उत्तर प्रदेश : ज्या मुलाच्या खांद्यावर आपल्या शहीद पित्याला अंतिम निरोप देण्याची जबाबदारी होती, त्यालाच घरी पोहोचण्यापूर्वी काळाने हिरावून नेले. शहीद सुभेदार मेजर सत्यवान यांचे पार्थिव चंदीगडहून उत्तर प्रदेशातील देवरिया येथे अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला रविवारी सकाळी पूर्वांचल एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत शहीद सत्यवान यांचा मुलगा गौरव सिंह याच्यासह चौघांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!

चंदीगडहून देवरियाकडे निघाले होते

शहीद सुभेदार मेजर सत्यवान यांचे पार्थिव चंदीगडहून त्यांच्या मूळ गावी देवरिया येथे नेले जात होते. रुग्णवाहिकेत त्यांचा मुलगा गौरव सिंह, भाऊ राजन चौधरी, पुतण्या राम समुझ सिंह आणि चालक जसपाल हे होते. शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय पार्थिवासोबत गावी जात होते. मात्र, सुलतानपूर जिल्ह्यातील हलियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वांचल एक्सप्रेसवेवर अज्ञात भरधाव वाहनाने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले.

मुलासह चौघांचा मृत्यू

या अपघातात गौरव सिंह आणि रुग्णवाहिका चालक जसपाल यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेले राजन चौधरी आणि राम समुझ सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका बाजूला रुग्णवाहिकेत शहीद सुभेदार मेजर सत्यवान यांचे पार्थिव आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, अशा दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी सज्ज असलेल्या गावात एकाच वेळी चार जणांच्या मृत्यूची बातमी पोहोचल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शहीद सुभेदार मेजर सत्यवान यांचे पार्थिव सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

हेही वाचा : Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!

Web Title: Shaheed subedar major satyawan son four killed ambulance accident purvanchal expressway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • Accident Case
  • Accident News
  • up news

संबंधित बातम्या

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू
1

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू
2

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत
3

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत

Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
4

Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.