Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: मुक्या जनावराचे प्राण वाचवताना प्रसिद्ध मराठी कवयित्री यांचा भीषण अपघातात मृत्यू; साहित्य क्षेत्रात शोककळा!

Accident News: रस्त्यात अचानक आडव्या आलेल्या मुक्या जनावराचा जीव वाचवताना प्रसिद्ध मराठी कवयित्रीचा महामार्गावरच संपला जीवनप्रवास! मुंबई-गोवा महामार्गावरील या हृदयद्रावक अपघाताने हादरले संपूर्ण साहित्य आणि शैक्षणिक विश्व...

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 16, 2026 | 04:08 PM
Accident News: मुक्या जनावराचे प्राण वाचवताना प्रसिद्ध मराठी कवयित्री यांचा भीषण अपघातात मृत्यू; साहित्य क्षेत्रात शोककळा!

Accident News: मुक्या जनावराचे प्राण वाचवताना प्रसिद्ध मराठी कवयित्री यांचा भीषण अपघातात मृत्यू; साहित्य क्षेत्रात शोककळा!

Follow Us
Follow Us:
  • गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कवयित्री डॉ. शरयू आसोलकर यांचा अपघात
  • शरयू आसोलकर यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे भाऊ गंभीर जखमी
  • जखमींना रुग्णालयात दाखल केले असून साहित्य क्षेत्रात शोककळा
Accident News: माणुसकी जपताना कधी कधी माणसाला आपला जीवही गमवावा लागतो. अशीच एक हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली आहे. रस्त्यावर अचानक समोर आलेल्या मुक्या जनावराचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात प्रसिद्ध मराठी कवयित्री आणि प्राध्यापिका डॉ. शरयू कृष्णा आसोलकर यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीजवळ झालेल्या या भीषण अपघातात त्यांचे निधन झाल्याची दुःखद माहिती समोर आली असून, या निधनाच्या बातमीने साहित्य, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. त्या ५९ वर्षांच्या होत्या.

हेही वाचा:Murder Pune: “पाणी भरण्याचा किरकोळ वाद ठरला जीवघेणा!” पुण्याच्या बालेवाडीत १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून… 

नेमकी काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शरयू आसोलकर या आपले भाऊ वैभव कृष्णा आसोलकर (वय ४६) यांच्यासोबत काही कामानिमित्त रत्नागिरी येथे गेल्या होत्या. तेथून दोघेही कारने सावंतवाडीच्या दिशेने परतत असताना, सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांची कार कणकवलीजवळील नांदगाव ओटव फाटा परिसरात आली.

यावेळी अचानक एक गाय कारसमोर आली. या मुक्या जनावराचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट महामार्गाच्या डिव्हाइडरला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र यादरम्यान डॉ. शरयू आसोलकर यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांचे भाऊ वैभव यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: Family Assault: “अश्लील मेसेजचा जाब विचारला म्हणून पोलिसाच्या कुटुंबावर हल्ला!”परप्रांतीय तरुणांच्या या मुजोरीमुळे उडाली खळबळ

साहित्य विश्वाची मोठी हानी

डॉ. शरयू कृष्णा आसोलकर या सावंतवाडीतील माठेवाडा येथील रहिवासी होत्या. त्या कुडाळ येथील महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. ‘पुढल्या हाका’, ‘अनवट वाटा’ यांसारख्या साहित्यकृतींसह ‘ब. बळीचा विषयी’ या पुस्तкаमुळे त्या वाचकांच्या चांगल्याच परिचयाच्या होत्या. कवयित्री आणि लेखिका म्हणून त्यांचे साहित्यविश्वात महत्त्वपूर्ण स्थान होते. त्यांच्या अचानक निधनाची बातमी समजताच सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा भीषण अपघात कुठे घडला आहे?

    Ans: मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीजवळ नांदगाव ओटव फाटा परिसरात हा अपघात घडला.

  • Que: अपघात नेमका कशामुळे झाला?

    Ans: कारसमोर अचानक आलेली गाय वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हाइडरला धडकली आणि हा अपघात झाला.

  • Que: डॉ. शरयू आसोलकर या कोणत्या क्षेत्रात कार्यरत होत्या?

    Ans: त्या कुडाळ येथील महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या आणि एक प्रसिद्ध कवयित्री व लेखिका म्हणून परिचित होत्या.

Web Title: Sindhudurg mumbai goa highway dr sharyu asolkar accident death sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Accident Case
  • Accident Death
  • highway news

संबंधित बातम्या

Pandharpur: “अचानक विहीर कोसळली अन्…” पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली चारजण…
1

Pandharpur: “अचानक विहीर कोसळली अन्…” पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली चारजण…

UAE मध्ये भरधाव ट्रकने 23 गाड्यांना चिरडल्यानंतर आगीचा भडका; 2 भारतीयांसह 14 जणांचा करुण अंत, 30 जण जखमी
2

UAE मध्ये भरधाव ट्रकने 23 गाड्यांना चिरडल्यानंतर आगीचा भडका; 2 भारतीयांसह 14 जणांचा करुण अंत, 30 जण जखमी

दिवाळीच्या दिवशी काळाचा घाला! भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
3

दिवाळीच्या दिवशी काळाचा घाला! भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

 Bus Accident: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळच काळाचा घाला! भीषण बस अपघाताने प्रशासनात खळबळ; प्रत्यक्षदर्शींनी सांगितल…
4

 Bus Accident: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळच काळाचा घाला! भीषण बस अपघाताने प्रशासनात खळबळ; प्रत्यक्षदर्शींनी सांगितल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.