Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarakhand Bus Accident: मृत्यूचे तांडव! ३० ते ३५ प्रवाशांनी भरलेली बस थेट १०० मीटर खोल पाण्यात कोसळली; भीषण अपघातांत १२ जणांचा..

Uttarakhand Bus Accident: रात्रीच्या अंधारात उत्तराखंडच्या डोंगराळ रस्त्यावर मृत्यूचे थैमान! ३० ते ३५ प्रवाशांनी भरलेली बस थेट १०० मीटर खोल पाण्यात कोसळली, तर बोलेरो ५०० मीटर दरीत कोसळून १२ जणांचा अंत... पाहा काळजाचा ठोका चुकवणारे सविस्तर वृत्त!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 17, 2026 | 11:45 AM
Uttarakhand Bus Accident: मृत्यूचे तांडव! ३० ते ३५ प्रवाशांनी भरलेली बस थेट १०० मीटर खोल पाण्यात कोसळली; भीषण अपघातांत १२ जणांचा..

Uttarakhand Bus Accident: मृत्यूचे तांडव! ३० ते ३५ प्रवाशांनी भरलेली बस थेट १०० मीटर खोल पाण्यात कोसळली; भीषण अपघातांत १२ जणांचा..

Follow Us
Follow Us:
  • उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग आणि ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर दोन भीषण अपघात घडले
  • बोलेरो ५०० मीटर दरीत कोसळून ४ जणांचा, तर प्रवासी बस खोल पाण्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू
  • पोलीस आणि एसडीआरएफच्या पथकांकडून जखमींना रुग्णालयात दाखल करत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Uttarakhand Bus Accident: उत्तराखंडमधून काळजाचा ठोका चुकवणारी आणि अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोमवारी रुद्रप्रयागमध्ये आणि मंगळवारी ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर असे दोन भीषण रस्ते अपघात घडले असून, या दोन्ही दुर्घटनांमध्ये मिळून आतापर्यंत तब्बल १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्रीच्या अंधारात प्रवास करत असताना एका बाजूला प्रवाशांनी भरलेली बस १०० मीटर खोल पाण्यात कोसळली, तर दुसरीकडे लग्नसमारंभातून परतणारी बोलेरो गाडी थेट ५०० मीटर खोल दरीत कोसळल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Suspicious Death: “चार विहिरींचे पाणी उपसले अन् हाती लागला मृत्यूचा सर्वात मोठा पुरावा!”दौलतबाबा मृत्यू प्रकरणात धक्कादायक सत्य?

बोलेरो गाडी ५०० मीटर खोल दरीत कोसळली

मिळालेल्या माहितीनुसार, बांसवाडा-कंधारा महामार्गावर एक बोलेरो गाडी प्रवाशांना घेऊन जात होती. दरम्यान, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही गाडी रस्त्याखाली सुमारे ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे सर्व प्रवासी एका लग्नसमारंभातून आपल्या गावी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातल्याची माहिती समोर आली आहे.

#WATCH | Tehri Garhwal, Uttarakhand: A bus fell into a ravine about 100 meters below a bridge near Gular Bazar. Upon receiving the information, teams from SDRF posts Byasi and Dhalwala immediately rushed to the spot and initiated rescue operations. Tehri District Magistrate Nitika Khandelwal and SSP Shweta Choubey have departed for the site. According to preliminary reports, about 30–35 people were on board the bus, out of whom approximately 20 injured individuals have been rescued. The injured are being rushed to the hospital via ambulances. Four people have lost their lives in the incident. The rescue operation is currently underway. (Source: Police) — ANI (@ANI) November 17, 2026

बसमध्ये तब्बल ३० ते ३५ प्रवासी होते; १०० मीटर खोल पाण्यात कोसळली

दुसऱ्या एका भीषण घटनेत, मंगळवारी ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावरील गुलार बाजारजवळ पुलाखाली सुमारे १०० मीटर खोल पाण्यात प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस अनियंत्रित होऊन कोसळली. अपघात झाला त्यावेळी या बसमध्ये तब्बल ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत होते. रात्रीच्या अंधारात घडलेल्या या दुर्घटनेत ८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, इतर बरेच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा: Beed Wangav Crime: “बचाव रे मला!” आईला केला शेवटचा कॉल अन् थरारक सत्याचा पर्दाफाश; अमानुष मारहाणीत तरुण जागीच मृत!

एसडीआरएफ आणि पोलिसांकडून युद्धपातळीवर बचावकार्य

या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफच्या (SDRF) ब्यासी आणि धलवाला चौक्यांमधील पथके घटनास्थळी दाखल झाली. एसडीआरएफ कमांडर अर्पण यदुवंशी यांच्या निर्देशानुसार सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, या दोन्ही अपघातांच्या नेमक्या कारणांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: उत्तराखंडमधील या दोन्ही अपघातांत एकूण किती जणांचा मृत्यू झाला आहे?

    Ans: रुद्रप्रयाग आणि ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर झालेल्या या दोन्ही भीषण अपघातांत मिळून आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावरील बस अपघात नेमका कसा घडला?

    Ans: गुलार बाजारजवळ पुलाखाली सुमारे १०० मीटर खोल पाण्यात ३० ते ३५ प्रवासी असलेली बस अनियंत्रित होऊन कोसळली, ज्यात ८ जणांचा मृत्यू झाला.

  • Que: बोलेरो गाडीचा अपघात कुठे आणि कसा झाला?

    Ans: बांसवाडा-कंधारा महामार्गावर लग्नसमारंभातून परतणाऱ्या बोलेरो गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती ५०० मीटर खोल दरीत कोसळली आणि यात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Uttarakhand rudraprayag rishikesh badrinath highway bus bolero accident 12 dead sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Accident Case
  • Accident Death
  • Bus Accident
  • Uttarakhand News

संबंधित बातम्या

Accident News: मुक्या जनावराचे प्राण वाचवताना प्रसिद्ध मराठी कवयित्री यांचा भीषण अपघातात मृत्यू; साहित्य क्षेत्रात शोककळा!
1

Accident News: मुक्या जनावराचे प्राण वाचवताना प्रसिद्ध मराठी कवयित्री यांचा भीषण अपघातात मृत्यू; साहित्य क्षेत्रात शोककळा!

Iran Bus Accident : इराण-इराक सीमेजवळ भीषण अपघात! गॅस रिफायनरी कामगारांची बस उलटून 12 जणांचा मृत्यू, 16 गंभीर जखमी
2

Iran Bus Accident : इराण-इराक सीमेजवळ भीषण अपघात! गॅस रिफायनरी कामगारांची बस उलटून 12 जणांचा मृत्यू, 16 गंभीर जखमी

Pandharpur: “अचानक विहीर कोसळली अन्…” पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली चारजण…
3

Pandharpur: “अचानक विहीर कोसळली अन्…” पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली चारजण…

UAE मध्ये भरधाव ट्रकने 23 गाड्यांना चिरडल्यानंतर आगीचा भडका; 2 भारतीयांसह 14 जणांचा करुण अंत, 30 जण जखमी
4

UAE मध्ये भरधाव ट्रकने 23 गाड्यांना चिरडल्यानंतर आगीचा भडका; 2 भारतीयांसह 14 जणांचा करुण अंत, 30 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.