Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shikrapur Crime: शिक्रापूर पोलिसांचा दणका; अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांना पन्नास हजारांचा दंड

कर्कश आवाजांच्या बुलेट वाहनांवर कारवाई मोहीम राबवून कर्कश आवाजांची बुलेट वाहने जप्त करणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 04, 2025 | 09:13 PM
Shikrapur Crime: शिक्रापूर पोलिसांचा दणका; अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांना पन्नास हजारांचा दंड
Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक महाविद्यालय परिसरात अल्पवयीन मुले दुचाक्या घेऊन स्टंट करणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे असे प्रकार होत असल्याचे समोर आले. त्यावर शिक्रापूर पोलिसांनी सदर महाविद्यालय परिसरात दुचाक्या घेऊन येणाऱ्या पालकांना दणका देत पंचवीस वाहन चालकांकडून पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, विकास सरोदे, अमोल दांडगे, विकास पाटील, हनुमंत गिरमकर, महिला पोलीस हवलदार उज्वला गायकवाड, किरण निकम यांनी साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय तळेगाव ढमढेरे समोर कारवाई मोहीम राबवत अल्पवयीन दुचाकी चालकांच्या दुचाक्या ताब्यात घेतल्या. तसेच तब्बल पंचवीस दुचाक्या ताब्यात घेऊन पंचवीस वाहन चालकांकडून रोख स्वरुपात पन्नास हजार रुपये दंड वसूल करुन पंधरा हजार रुपयांचा दंड वाहनांवर ऑनलाईन पद्धतीने दंड लावण्यात आला आहे.

तर या कारवाई मुळे रोडरोमिओ वाहन चालकांनी चांगलाच धसका घेतला असून काही पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  तर यावेळी बोलताना लवकरच पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कर्कश आवाजांच्या बुलेट वाहनांवर कारवाई मोहीम राबवून कर्कश आवाजांची बुलेट वाहने जप्त करणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांनी सांगितले. शिक्रापूर पोलिसांनी केलेल्या कारवाई बाबत काही पालकांनी आमची मुले वाड्या वस्त्यांवरुन शाळेसाठी येत असतात आमच्या येथे एस टी अथवा वाहनांची सोय नाही त्यामुळे मुले मोटार सायकलहून येतात मात्र पोलिसांनी कारवाई केल्यास मुलांना शाळेत पाठवायचे कसे असा सवाल देखील काही पालकांनी उपस्थित केला आहे.

सणसवाडीत दोन मटका अड्ड्यांवर छापा

सणसवाडीत दोन ठिकाणी सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापे टाकत कारवाई केली आहे. याप्रकरणी दिपक विजय मोरे (वय ३१), आतिष सुखदेव दरेकर (वय ३०), विकी बाळासाहेब हरगुडे (वय २९), प्रवीण बबनराव दरेकर (वय ३३) व सलीम हसन शेख (वय ४९ सर्व रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दामोदर तुळशीराम होळकर (वय ४१ रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

Crime News : सणसवाडीत दोन मटका अड्ड्यांवर छापा; शिक्रापूर पोलीसांची मोठी कारवाई

सणसवाडी (ता. शिरुर) येथील जय अंबिका कला केंद्रच्या भिंतीच्या बाजूला काही जण नागरिकांकडून पैसे घेऊन मटका खेळवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार, पोलीस हवालदार रविकिरण जाधव यांनी हॉटेल जय अंबिका कला केंद्रच्या भिंतीच्या बाजूला जाऊन छापा टाकला. यात काही जण नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांना कागदावर आकडे लिहून देऊन मटका खेळवत असल्याचे दिसून आले. दरम्यान पोलिसांनी दोन्ही ठिकाणच्या मटका खेळवणाऱ्या लोकांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील जुगाराचे साहित्य व रक्कम असा अकरा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पुढील तपास पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.

Web Title: Shikrapur police have imposed a fine of fifty thousand on the parents of minor drivers crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 08:59 PM

Topics:  

  • crime news
  • Shikrapur
  • Shikrapur Police

संबंधित बातम्या

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
1

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?
2

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

अन् तिच्या प्रेमापोटी आई-वडील पुन्हा आले एकत्र ..! घर सोडून जाण्याच्या दहावीच्या विद्यार्थीनीच्या मदतीला धावल्या ‘दामिनी दीदी’
3

अन् तिच्या प्रेमापोटी आई-वडील पुन्हा आले एकत्र ..! घर सोडून जाण्याच्या दहावीच्या विद्यार्थीनीच्या मदतीला धावल्या ‘दामिनी दीदी’

वालचंदनगरमघील भाळे टोळीवर ‘मोक्का’ कारवाई ; 10 जणांना ठोकल्या बेड्या
4

वालचंदनगरमघील भाळे टोळीवर ‘मोक्का’ कारवाई ; 10 जणांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.