विद्युत रोहित्र चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. या पथकाने पाच जणांना मुद्देमालासह अटक करत तब्बल ११ गुन्हे उघड केले आहेत.
आठ मेडिकलचे शटर उचकटून प्रत्येक मेडिकल मधील रोख रक्कम चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीच्या घटनेतील चोरट्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे.
शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार रात्रीच्या सुमारास वाहनांतील डिझेल चोरीच्या घटना घडत होत्या. मात्र नुकतेच एका ट्रक चालकाला मारहाण दगडफेक करुन डिझेल चोरीची घटना घडलेली होती.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे- नगर महामार्गावर कार समोरून अचानकपणे भरधाव टँकर आडवा आल्याने झालेल्या अपघातात कारचा चक्काचूर होऊन तिघे गंभीर जखमी झाले आहेत.