crime (फोटो सौजन्य: social media)
राज्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न सर्व स्तरांकडून करण्यात येत आहे. मात्र तरी देखील खून, बलात्कार, हाणामारी, दरोडा अश्या अनेक घटना दैनंदिन घडत आहे. आता देशाची राजधानी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी मिळून सामूहिक अत्याचार केल्याचं समोर आला आहे. पोलिसांनी या पाच आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे हे अत्याचार करणारे पाचही मुले हे अल्पवयीन आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात ही घटना घडली. या मुलीचे अश्लील व्हिडीओ चित्रित करण्यात आले होते. हे व्हिडीओ दाखवून या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्यात आले. या ब्लॅकमेलिंगला बळी पडून पाच अल्पवयीन मुलांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केले. या घटनेने काळाचौकी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पीडित मुलीवर अत्याचार सुरु होते. सततच्या या अत्याचाराला कंटाळून अखेर मुलीने तिच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीने ताब्यात घेतले आहे. ही पाच मुले कोण आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे. काळाचौकी पोलिसांनी मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या पाचही जणांना ताब्यात घेतले आहे. या सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर काळाचौकी परिसरात संतापाचे वातावरण आहे.
परळीत परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; तृतीयपंथीयाने काम देण्याचं दाखवलं आमिष
बीडमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बीडच्या परळी तालूक्यातील अस्वलांबा गावाच्या शिवारात एका परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा घटना समोर येत आहे. या प्रकरणी तीन नराधमांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली आहे. या प्रकरणात चौघांविरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, २० वर्षाच्या एका परप्रांतीय तरुणीने रेल्वेने मुंबईवरून हैदराबादकडे जात होती. त्यावेळी ती परळी स्टेशनवर उतरून ती एका हॉटेलमध्ये जेवत असतांना तृतीयपंथी पूजा गुट्टे हिची तिच्यावर नजर पडली. पूजा हिने तिच्याशी संवाद साधत तिची गरज जाणून घेतली आणि काम देण्याचे आश्वासन दिले. यानंतर पूजा हिने सतीश मुंडे व मोहसीन पठाण यांना बोलावून घेतले.
या तिघांनी पीडितेला मोटारसायकलवर बसून अस्वलंबा येथील भागवत कांदे याच्याकडे गेले. त्या ठिकाणी या तिघांनी या परप्रांतीय तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणात डायल ११२ला एका नागरिकाने फोन करत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणात सतीश मुंडे, मोहसीन पठाण व भागवत कांदे यांना अटक केली आहे. तर तृतीयपंथी पूजा गुट्टेचा शोध परळी ग्रामीण पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.