crime (फोटो सौजन्य : social media)
मध्यप्रदेशमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधी त्याच्या मित्रासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर त्याच्यावर लिंगबदल शस्त्रक्रिया केली, त्याच्यावर बलात्कार केला. पीडित व्यक्तीला १० लाख रुपयांसाठी धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात भोपाळच्या गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये झिरो एफआयआर दाखल केली आहे. आता हा एफआयआर गुन्हा ज्या ठिकाणी घडला त्या नर्मदापुरम येथे हस्तांतरित करण्यात येणार आहे.
धक्कादायक ! डॉक्टरने तरुणीला चेकअपच्या नावाखाली बेडवर झोपवलं अन् नंतर…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय पीडित व्यक्त हा भोपाळच्या जवळ असलेल्या ओबेदुल्लागंज भागातील रहिवासी आहे. पीडित व्यक्तीची ओळख शुभम यादव सोबत झाली. शुभम यादव हा नर्मदापुरम येथील रहिवासी आहे. बहिणीच्या सासरच्या घरी गेल्यानंतर या दोघांची भेट झाली. तर एकमेकांच्या जवळ आले आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
२५ वर्षीय पीडित व्यक्ती हा भोपाळच्या ग्रामीण भागातील आहे आणि तो शुभम बरोबर शहरातील अशोक गार्डनर परिसरात भाड्याच्या घरात राहात होता. दोघांमध्ये मैत्री झाली आणि या काळात शुभमने त्या व्यक्तीबद्दल असलेल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली.
पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार. काही महिन्यापूर्वी शुभमला डोकेदुकीचा त्रास नियमित होत असल्याचे कारण देऊन वैधकीय पासणीच्या बहाण्याने त्याला घेऊन भोपाळमधील एमपी नगर येथील एका खाजगी रुग्णालयात गेला. पीडित व्यक्तीला माहिती न देता किंवा त्याच्या संमतीशिवाय, आरोपीने त्याला कथित आजारासाठी औषध देण्याच्या बहाण्याने हार्मोन थेरपी देण्यास सुरुवात केली. “एका महिन्याच्या आत, मला माझ्या शरिरात बदल जाणवण्यास सुरूवात झाली, आणि मी खूपच गोंधळलो आणि घाबरलो,” परंतु नेमकं काय सुरु आहे हे त्याच्या लक्षात येण्याच्या आधीच शुभम त्याला कथितपणे इंदोर येथे घेऊन आला. तिथे त्याची लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्याच्या माध्यमातून त्याला बळजबरीने पुरुषापासून स्त्री बनवण्यात आले. या पुन्हा बदलता न येणाऱ्या प्रक्रियेसाठी त्यांना जवळपास ५ लाख रूपयांचा खर्च आला.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर आरोपीने पीडितेला नर्मदापूरम येथे बोलावले, तिथे त्याने त्याचा लैंगिक छळ केला. पण हे सर्व इथेच थांबवले नाही. त्यानंतर पीडित व्यक्तीला शुभमने धमकी देऊन त्याच्याकडून १० लाख रुपये मागितल्याचा आरोप केला आहे. जर पैसे दिले नाहीत तर आयुष्य बरबाद करणार असल्याची धमकी दिल्याचेही आरोप व्यक्तीने केला आहे.
गांधीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी विजेंद्र मारस्कोले यांनी सांगितले की “पीडित व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही एक झिरो एफआयआर दाखल केला आहे. प्रकरणात शारीरिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप आहेत. ही घटना प्रामुख्याने नर्मदापुरममध्ये घडली असल्याने, पुढील तपासासाठी केस डायरी तेथे पाठवली जाईल,” असे त्यांनी सांगितले.सध्या तरी या प्रकरणात कोणतीही अटक झालेली नाही. तर पोलिसांनी ते पुढील जबाब नोंदवतील आणि भोपाळ आणि इंदोर येथील संबंधित रुग्णालयांचे मेडिकल रिपोर्ट तपासतील असे सांगितले आहे.
स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेचा व्हिडीओ चित्रित करणाऱ्या इंजिनिअरला अटक; मोबाइल ताब्यात