Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News: धक्कादायक! नामांकित कंपनीच्या चॉकलेटमध्ये निघाल्या जिवंत अळ्या; व्हिडिओ व्हायरल, FDAकडे तक्रार

अकोल्यात एका नामांकित कंपनीच्या चॉकलेटमध्ये वळवळणाऱ्या अळ्या आढळल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित पालकांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) तसेच ऑनलाइन ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली असून, उत्पादनाची गुणवत्ता आणि पॅकेजिंगची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 06, 2026 | 03:48 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अकोल्यात नामांकित कंपनीच्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्याचा दावा; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • संबंधित पालकांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि ऑनलाइन ग्राहक मंचाकडे अधिकृत तक्रार दाखल केली.
  • उत्पादनाची गुणवत्ता, पॅकेजिंग आणि साठवणुकीची चौकशी करून योग्य कारवाईची मागणी.
अकोला: लहान मुलांच्या आवडीच्या चॉकलेटबाबत अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नामांकित कंपनीच्या चॉकलेटमध्ये वळवळणाऱ्या अळ्या आढळल्याचा दावा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुलासाठी खरेदी केलेले चॉकलेट उघडल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आल्याचा दावा संबंधित पालकांनी केला असून, त्यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) तसेच ऑनलाइन ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

चॉकलेट उघडताच धक्का

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील संतोष शिंदूरसे यांनी आपल्या मुलासाठी एका नामांकित कंपनीचे चॉकलेट खरेदी केले होते. चॉकलेटचे पॅकेट उघडल्यानंतर त्यामध्ये वळवळणाऱ्या अळ्या दिसल्याचा त्यांचा दावा आहे. त्यानंतर त्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Kolhapur Crime: संतापजनक! सात नराधमनी केला शाळकरी मुलीवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ…

संतोष शिंदूरसे यांनी संबंधित उत्पादनाची गुणवत्ता, उत्पादनाची मुदत, साठवणूक आणि पॅकेजिंग यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने संभाव्य आरोग्याचा धोका टळल्याचेही त्यांनी सांगितले.

FDAकडे तक्रार

या घटनेनंतर संबंधित पालकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) अधिकृत तक्रार दाखल केली आहे. चॉकलेटमध्ये अळ्या कशा आल्या, उत्पादन किंवा साठवणुकीत काही त्रुटी होती का, याची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता या तक्रारीवर अन्न व औषध प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑनलाइन ग्राहक मंचाकडेही धाव

याशिवाय संतोष शिंदूरसे यांनी ऑनलाइन ग्राहक तक्रार निवारण पोर्टलवरही तक्रार नोंदवली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रकार असल्याने संबंधित कंपनीने याबाबत स्पष्टीकरण द्यावे आणि उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणात संबंधित कंपनीची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. तक्रारीची चौकशी आणि संबंधित यंत्रणांच्या अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Delhi Crime: ऑफिसमध्ये पार्टी, घरी जाण्यासाठी निघाली… काही तासांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; 20 लाखांच्या हुंड्याचा आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा प्रकार कुठे घडला?

    Ans: अकोल्यात एका पालकाने मुलासाठी घेतलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्याचा दावा केला आहे.

  • Que: या प्रकरणी कोणाकडे तक्रार करण्यात आली आहे?

    Ans: अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि ऑनलाइन ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • Que: पालकांची मुख्य मागणी काय आहे?

    Ans: चॉकलेटची गुणवत्ता, पॅकेजिंग आणि साठवणुकीची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे

Web Title: Shocking live worms found in a renowned companys chocolate video goes viral complaint lodged with the fda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Akola
  • Chocolate
  • FDA

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा
1

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर
2

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.