आई की क्रूरता...! चिमुकलीने अंथरुणात लघवी केली म्हणून प्रायव्हेट पार्टवर दिले चटके
केरळच्या कांजिकोड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सावत्र आईने पाच वर्षांच्या निष्पाप मुलीवर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. तिने फक्त अंथरुण ओले केले म्हणून तिच्या सावत्र मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर गरम स्टिलचा चमचा लावला. अंगणवाडीच्या वर्गात बसताना या चिमुकलीला त्रास झाला, त्यावेळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर या अंगणवाडीतील शिक्षकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेनंतर पोलिसांच्या पथकाने आरोपी सावत्र आईला अटक केली.
ही संपूर्ण घटना गेल्या आठवड्यात घडल्याचे वृत्त आहे. कांजिकोडजवळ सावत्र आईने निष्पाप मुलीवर क्रूर कृत्य केले. वृत्तानुसार, मुलीने अंथरुण ओले केले, ज्यामुळे ती महिला संतापली. रागाच्या भरात तिने गरम स्टीलच्या चमच्याने मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर चटके दिले. मुलीच्या अंगणवाडी शिक्षिकेला जेव्हा लक्षात आले की तिला वर्गात बसण्यास त्रास होत आहे तेव्हा ही घटना उघडकीस आली. अंगणवाडी शिक्षिकेने मुलीची चौकशी केली, त्यानंतर तिने तिच्या शिक्षिकेला संपूर्ण घटनेबद्दल सांगितले.
मुलीकडून संपूर्ण घटना कळताच अंगणवाडी शिक्षिकेला धक्का बसला. त्यानंतर तिने पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथकही सक्रिय झाले. पोलिसांनी गुरुवारी सावत्र आईला अटक केली आणि तिला १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवले. ही महिला बिहारची रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, तिच्याविरुद्ध बीएनएस आणि बाल न्याय कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, मुलीचे वडील नेपाळी नागरिक आहेत आणि ते एका हॉटेलमध्ये काम करतात. मुलगी सध्या बाल कल्याण समितीच्या देखरेखीखाली आहे.






