
crime (फोटो सौजन्य: social media)
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यातून महिलांच्या सुरक्षेला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या पतीसह सासरच्या लोकांवर गंभीर आणि अमानुष अत्याचारांचे आरोप केले आहेत. विशेषत: तिच्या पतीने जुगार खेळताना पत्नीला ‘दाव’ म्हणून लावले आणि त्यात हरल्यानंतर ८ पुरुषांकडून तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप तिने पोलिसांकडे केला आहे. आरोपींमध्ये तिच्या सासऱ्यांसह दोन दीर आणि इतर नातेवाईकांचाही समावेश असल्याचे तिने सांगितले.
टेंभुर्णीजवळ टॅंकरची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकाचा जागीच मृत्यू, सकाळीच ड्युटी संपवली अन्…
नेमकं प्रकरण काय?
पीडित महिलेचे लग्न 24 ऑक्टोबर 2024 रोजी मेरठमधील खिवई गावातील दानिश नावाच्या व्यक्तीशी झाले होते. लग्नावेळी मिळालेला हुंडा आपल्या अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्याने पती दानिश नाराज होता. त्याला दारू आणि जुगाराचे व्यसन होते. लग्नानंतर महिलेवर शारीरिक व मानसिक अत्याचार सुरू झाले. एके दिवशी दानिशने जुगार खेळताना पत्नीला दावावर ठेवले आणि जुगार हरल्यानंतर पत्नीचा भयंकर छळ सुरू झाला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ८ पुरुषांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केले, ज्यामध्ये गाझियाबादमधील तीन पुरुषांचा देखील समावेश होता. महिलेच्या सर्वात जवळच्या नातेवाईकांनी सासऱ्यांनी आणि दोन दीरांनी अत्याचार केला असल्याने ती पूर्णपणे तुटून गेली.
अॅसिड हल्ल्यापासून हत्या प्रयत्नापर्यंत छळ
पीडितेने सांगितले की, सासरच्या लोकांनी सतत हुंड्यासाठी त्रास दिला. ‘जर पैसा आणला नाहीस तर आमच्या सर्व आज्ञा पाळाव्या लागतील’, अशी धमकी दिली जात होती. ती गर्भवती झाल्यावर जबरदस्तीने गर्भपात करवून घेतला गेला. शिवाय, तिच्या पायावर अॅसिड ओतून तिला गंभीर जखमी केले. इतकेच नव्हे तर तिला नदीत ढकलून मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, ती कसाबसा जीव वाचवून पळाली आणि आपली माहेरी गाठली. तिथे पालकांनी तिला सुरक्षित आश्रय दिला.
सध्याच्या घडीला, पीडित महिलेने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तिच्या तक्रारीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
Bomb Expiry Date: बॉम्बची एक्सपायरी डेट असते का; कालबाह्य स्फोटकांचा धोका का वाढतो?
Ans: आठ
Ans: उत्तरप्रदेश
Ans: दानिश