बॉम्बची एक्सपायरी डेट असते का; कालबाह्य स्फोटकांचा धोका का वाढतो?
Bomb Expiry Date: राजधानी दिल्लीत १० नोव्हेंबरला झालेल्या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. हे प्रकरण ताजे असतानानच त्यानंतर अवघ्या काही तासांच्या आता श्रीनगरमधील एका पोलिस स्टेशनमध्ये बॉम्ब निकामी करताना स्फोट झाला. बॉम्ब बनवण्यापासून ते निकामी करण्यापर्यंत त्याची योग्य काळजी घेणे आणि हाताळणे महत्त्वाचे असते. पण तुम्हाला माहिती आहे का, औषधे, बॅटरी आणि अन्नाप्रमाणे, बॉम्बची देखील एक्सपायरी डेट असते. दारूगोळा, क्षेपणास्त्रे आणि स्फोटके कायम स्वरूपी टिकवण्यासाठी डिझाइन केलेली नाहीत. कालांतराने, त्यातील रसायने आणि घटक खराब होऊ लागतात.

स्फोटके ही रासायनिक संयुगांपासून बनलेली असतात जी कालांतराने हळूहळू त्यांची स्थिरता गमावू लागतात. उष्णता, आर्द्रता आणि दीर्घकाळ साठवणुकीमुळे ही रसायने विघटित होतात. जुना बॉम्बचा योग्य वेळी स्फोट होऊ शकत नाही, किंवा कधीकधी तो हाताळणी किंवा वाहतुकीदरम्यान आपोआप स्फोट होऊ शकतो.
बॉम्ब कालबाह्य होत असताना त्यांचा धोका अधिक वाढतो. एकीकडे अशा बॉम्बचा युद्धात वापर केला तर ते योग्य क्षणी स्फोट होणार नाहीत, तर दुसरीकडे रासायनिक अभिक्रियांमुळे ते अनवधानानेही फुटू शकतात. लष्कराला असा अनियंत्रित धोका परवडत नसल्यामुळे जुने स्फोटक वेळेत ओळखून त्यांची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावली जाते.
स्फोटक द्रव्यांशिवाय बॉम्बमध्ये फ्यूज, सर्किट, टायमर, बॅटरी, प्रेशर सेन्सर आणि यांत्रिक ट्रिगर असे अनेक घटक असतात. हे घटक कालांतराने गंजतात, चार्ज कमी होतो किंवा त्यांची कार्यक्षमता घटते. यामुळे बॉम्ब अस्थिर होण्याचा धोका वाढतो.
बॉम्ब उत्पादक प्रत्येक दारूगोळ्याचे आयुर्मान निश्चित करतात. पारंपारिक बॉम्ब साधारण 10 ते 20 वर्षे टिकतात, तर क्रूझ क्षेपणास्त्रे किंवा अण्वस्त्रे यांसारखी अत्याधुनिक शस्त्रे 30 ते 50 वर्षे कार्यक्षम राहू शकतात.

सैन्य नियमितपणे दारूगोळ्याचा साठा तपासते. रासायनिक गळती, गंज किंवा क्षयीकरणाची चिन्हे दिसताच त्या साठ्याला कालबाह्य घोषित केले जाते. अशा बॉम्बची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष प्रशिक्षित स्फोटक शस्त्रास्त्र निष्कासन पथके (EOD) तैनात केली जातात. नियंत्रित स्फोट, ठराविक रसायनांचे जाळणे किंवा सुरक्षित घटक वेगळे करून नष्ट करणे अशा पद्धतीने जुने स्फोटक हटवले जातात.
काही प्रसंगी हे जुनाट पण स्थिर स्फोटके फील्ड प्रशिक्षणासाठी वापरले जातात, परंतु त्यांचे आयुष्य संपण्यापूर्वीच त्यांना सुरक्षितरीत्या नष्ट करणे आवश्यक मानले जाते.
बॉम्बमध्ये TNT, RDX, PETN, बारूद यांसारखे रासायनिक स्फोटक पदार्थ असतात.
हे पदार्थ: वेळेनुसार रासायनिक बदल होतात,
ओलावा, उष्णता, थंडी किंवा साठवणुकीतील चुका यामुळे खराब होतात,
आणि काही वर्षांनंतर अस्थिर होऊ शकतात.
हे प्रकारावर अवलंबून असते:
1) मिलिटरी ग्रेड बॉम्ब (TNT / RDX / PETN)
योग्य साठवणुकीत → 20 ते 50 वर्षे टिकू शकतात
पण 20 वर्षांनंतर त्यांची कार्यक्षमता कमी होऊ लागते
काही वेळा अतिशय जुने बॉम्ब अचानक फुटण्याचा धोका वाढतो
2) बारूदी बॉम्ब / दारूगोळा
बारूद ओलाव्याने खराब होते
साधारण 5 ते 10 वर्षांत निकामी होऊ शकतात
3) IED (हस्तनिर्मित बॉम्ब)
यांना निश्चित आयुष्य नसते
असुरक्षित बनावटपणामुळे काही महिन्यांतच निकामी होऊ शकतात
वायर, बॅटऱ्या, डेटोनेटर खराब होतात
4) ते निकामी कसे होतात?
बॅटऱ्या डिस्चार्ज होतात (IED मध्ये)
डेटोनेटर खराब होतो
स्फोटक द्रव्य खराब होते
ओलावा आणि गंज यामुळे सर्किट तुटते
निकामी झालेला बॉम्ब फक्त “फुटत नाही” असं नाही —
तो अस्थिर आणि अधिक धोकादायक होऊ शकतो.
Ans: होय. औषधे, अन्नपदार्थ किंवा बॅटरी याप्रमाणेच बॉम्ब आणि स्फोटकांना देखील एक निश्चित आयुर्मान असते.
Ans: बॉम्बमध्ये असलेले TNT, RDX, PETN, बारूद यांसारखे स्फोटक रसायने उष्णता, आर्द्रता, थंडी आणि दीर्घकाळ साठवणीमुळे विघटित होतात. त्यामुळे बॉम्ब अस्थिर होऊ लागतो.
Ans: पारंपारिक बॉम्ब: 10 ते 20 वर्षे अत्याधुनिक क्षेपणास्त्रे/अण्वस्त्रे: 30 ते 50 वर्षे






