Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baba Siddique Murder Case : ‘मला शोधू नका’ म्हणत शुभम पसार; लोणकर बंधूबाबत मोठी माहिती समोर

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्धीकींच्या हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांनी पुण्यातील वारजे भागातून प्रवीण लोणकर या तरुणाला अटक केली. प्रवीणचा भाऊ शुभम लोणकर याचाही पोलीस शोध घेत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 15, 2024 | 11:33 AM
Baba Siddique Murder Case : ‘मला शोधू नका’ म्हणत शुभम पसार; लोणकर बंधूबाबत मोठी माहिती समोर

Baba Siddique Murder Case : ‘मला शोधू नका’ म्हणत शुभम पसार; लोणकर बंधूबाबत मोठी माहिती समोर

Follow Us
Follow Us:

पुणे : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्धीकींच्या हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांनी पुण्यातील वारजे भागातून प्रवीण लोणकर या तरुणाला अटक केली. प्रवीणचा भाऊ शुभम लोणकर याचाही पोलीस शोध घेत आहेत. लोणकर बंधूंचे वास्तव्य गेल्या काही वर्षांपासून वारजेत असल्याचे समोर आले असून, शुभम लोणकर हा बिष्णोई गँगशी संबंध ठेवून असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ‘मला शोधू नका’ असे म्हणत शुभम पुण्यातून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येपुर्वी शुभम लोणकरने सोशल मिडीयावर पोस्ट केली होती. बिश्नोई गँगने सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारल्याचे नमूद केले होते. नंतर मुंबई पोलिसांनी शुभमचा शोध सुरू केला. याप्रकरणात पोलिसांनी शुभमचा भाऊ प्रवीणला अटक केली. यासर्व घडामोडीनंतर बिश्नोई गँगच्या पुणे कनेक्शनच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसही सतर्क झाले आहेत.

लोणकर भावांची माहिती घेतली. शुभम आणि प्रवीण लोणकर मूळचे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आहेत. ते दोघे २०११ मध्ये पुण्यात स्थायिक झाले. तर, त्यांचे आई-वडीलही २०१९ मध्ये पुण्यात आले. कर्वेनगर परिसरातील भालेकर वस्तीत लोणकर कुटुंबीय राहत होते. २०२२ मध्ये त्यांनी लोणकर डेअरी व्यवसाय सुरू केला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

भंगार व्यावसायिकांकडे आरोपींची भेट

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी शिवकुमार गौतम, शुभम लोणकर, धर्मराज कश्यप यांना प्रवीण लोणकरने वारजे येथील एका भंगार व्यावसायिकाकडे कामाला लावले होते. तेथे त्यांची ओळख झाल्याची माहिती पुढे आली आहे.

‘एनसीसी’चा विद्यार्थी, भगतसिंहांच्या विचाराने प्रेरित

शुभम लोणकर हा शालेय शिक्षण घेताना ‘एनसीसी’चा विद्यार्थी होता. त्याच्यावर भगतसिंहाच्या विचारांचा पगडा होता. त्यातूनच त्याचे विचार जहाल झाले.

राजस्थानात झाला भरती कॅम्प

लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये अलीकच्या काळात तरूणांना भरती करून घेण्यात आल्याचीही माहिती पोलीस यंत्रणेच्या तपासात समोर आली आहे. त्यासाठी राजस्थान येथे भरती कॅम्प झाला. या कॅम्पमध्ये शुभम लोणकर सहभागी झाला होता. तेथूनच त्याचा बिश्नोई गँगशी संबंध आला आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title: Shubham lonkar who accepted the responsibility of baba siddiquis murder has absconded nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 11:30 AM

Topics:  

  • maharashtra
  • Pune Crime
  • Shubham Lonkar

संबंधित बातम्या

Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
1

Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण
2

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण

मागासवर्गीय आयोगाचा सदस्य म्हणून मिरवला, पोलिसांची सलामीही घेतली; सत्य समोर येताच उडाली खळबळ
3

मागासवर्गीय आयोगाचा सदस्य म्हणून मिरवला, पोलिसांची सलामीही घेतली; सत्य समोर येताच उडाली खळबळ

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?
4

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.