सौजन्य फोटो - सोशल मिडीया
दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मुंबई वाहतूक पोलीस दलात कार्यरत आहेत. गेल्या रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आरोपींनी पीडित पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला आणि अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवून त्यांच्याशी गैरवर्तन केले. हा प्रकार निदर्शनास येताच पीडित कुटुंबाने संबंधित परप्रांतीय कुटुंबाला याबाबत जाब विचारला. मात्र, आपली चूक मान्य करण्याऐवजी आरोपींनी उलट पीडित पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलींनाच बेदम मारहाण केली.
या प्रकरणी मंगळवारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या घटनेची दखल घेत जयस्वाल, नीरज जयस्वाल (वय २२), सुजित जैयस्वाल, प्रदीप वर्मा (वय २५) यांच्यासह आणखी एकाविरोधात ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मात्र, पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्याच कुटुंबावर हल्ला होऊनही कोळसेवाडी पोलिसांनी आरोपींवर केवळ सौम्य स्वरूपाची कलमे लावल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
हेही वाचा: Newborn Baby: “रात्रीच्या अंधारात ओढ्यातून आला रडण्याचा आवाज…” त्या अमानुष प्रकाराने…
पोलिसांच्या या भूमिकेनंतर पीडित मराठी कुटुंबाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे (मनसे) धाव घेतली आहे. मनसेच्या नगरसेविका शीतल मंढारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष सतीश उगले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
Ans: पीडित कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मुंबई वाहतूक पोलीस दलात कार्यरत आहेत.
Ans: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.






