Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: आधी प्रेयसीचा गळा चिरला, नंतर प्रियकराने स्वतःच्याही गळ्यावर केले वार; कारण काय?

सोलापूरच्या 20 वर्षीय स्नेहा बनसोडेचा अक्कलकोटमध्ये प्रियकर आदित्य चव्हाणने गळा चिरून खून केला. घटनेनंतर आरोपीने स्वतःवरही वार केले. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याचा संशय असून आरोपीवर उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 06, 2026 | 11:06 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • अक्कलकोटमधील पिरजादे प्लॉट परिसरात तरुणीचा निर्घृण खून
  • प्रियकरानेच गळा चिरून हत्या; नंतर आत्महत्येचा प्रयत्न
  • प्रेमसंबंध, कुटुंबीयांचा विरोध हे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने आपल्या प्रेयसीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर त्याने हत्या केल्यानंतर स्वतःच्या गळ्यावरही धारधार शस्त्राने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. हत्या झालेल्या तरुणीचे नाव स्नेहा श्रीकांत बनसोडे (वय 20, रा.रामवाडी, सोलापूर) असे आहे तर आदित्य रमेश चव्हाण (रा.नागूरतांडा, ता. अक्कलकोट) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना अक्कलकोट येथील बासलेगाव रोडवरील लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे सकाळी 10.30 ते 11.45 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

धक्कादायक ! चौघांच्या टोळक्याने तरुणाची चाकूने भोसकून केली हत्या; आधी बेदम मारहाण केली अन् नंतर…

काय नेमकं प्रकरण?

मुलीच्या आईचे महेर हे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी आहे. मुलीचे मामा खाजप्पा पोतेनवरू हे मैंदर्गीत राहतात. तेथे स्नेहा बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी मामाकडे होती. येथे मैंदर्गीजवळील नागूरतांडा येथील आदित्यशी तिची ओळख झाली. तो स्नेहाला मोबाइलवरून ‘तुझ्यासोबत लग्न करणार आहे,’ असे म्हणायचा. ‘तू तिच्याशी बोलू नको, परत आमच्या घराकडे फिरकू नको, तुझ्यासोबत आम्ही मुलीचे लग्न लावून देणार नाही,’ असे कुटुंबियांनी त्याला सांगितले होते. म्हणजेच स्नेहाच्या कुटुंबियांना दोघांच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. मात्र तरीही दोघे संपर्कात होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे संशय व्यक्त केला जात आहे.

काय घडलं नेमकं?

रविवारी दुपारी दीडच्या सुमारास आई शाळेतून घरी आली. त्यावेळी मुलगी स्नेहा घरात नव्हती. आईने दुसरी मुलगी प्रतीक्षाला विचारले असता स्नेहा नवीन वर्षानिमित्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेल्याचे तिने सांगितले. त्यानंतर शेजारच्या मैत्रिणीकडून स्नेहाचा अक्कलकोटमध्ये घातपात झाल्याचे समजले. त्यानंतर स्नेहाचे आई व नातेवाईक अक्कलकोटमधील सरकारी दवाखान्यात गेले. तिथे स्नेहाच्या गळ्यावर धारदार तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने रक्तस्त्राव झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आता मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. जखमी तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

गुन्हा दाखल

स्नेहाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आरोपी आदीत्य चव्हाणवर उपचार झाल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल.

Nanded Crime: नांदेडमध्ये माणुसकीला काळिमा! 60 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग, आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणी आणि आरोपी कोण होते?

    Ans: स्नेहा श्रीकांत बनसोडे (20, सोलापूर) हिचा खून झाला असून आदित्य रमेश चव्हाण (अक्कलकोट) हा आरोपी व जखमी आहे.

  • Que: ही घटना कशी घडली?

    Ans: ही घटना कशी घडली? उत्तर: अक्कलकोटमध्ये दोघे एकत्र असताना आदित्यने स्नेहाचा गळा चिरून खून केला आणि नंतर स्वतःच्या गळ्यावर वार केला. प्रश्न 3: पोलिसांनी काय कारवाई केली आहे? उत्तर: मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना पुढील तपास केला जात आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना पुढील तपास केला जात आहे.

Web Title: Solapur crime first he slit his girlfriends throat then the boyfriend inflicted wounds on his own throat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nanded Crime: नांदेडमध्ये माणुसकीला काळिमा! 60 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग, आरोपी अटकेत
1

Nanded Crime: नांदेडमध्ये माणुसकीला काळिमा! 60 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग, आरोपी अटकेत

Buldhana Accident : भीषण अपघातांची मालिका! बुलढाणा–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एसटी–दुचाकी धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू
2

Buldhana Accident : भीषण अपघातांची मालिका! बुलढाणा–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एसटी–दुचाकी धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू

Latur Crime: लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात सहावीतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात, पोलीस तपास सुरू
3

Latur Crime: लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात सहावीतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात, पोलीस तपास सुरू

Jharkhand Crime: झारखंड हादरले! प्रेयसीसाठी पत्नीचा खून; मृतदेह लपवण्यासाठी कुत्र्यालाही मारून पुरले
4

Jharkhand Crime: झारखंड हादरले! प्रेयसीसाठी पत्नीचा खून; मृतदेह लपवण्यासाठी कुत्र्यालाही मारून पुरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.