काय घडलं नेमकं?
लालवंडी येथील ८ वर्षांची पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती. तुळशीराम विठ्ठल इंगळे हा इथे आला आणि त्याने तिला फसवून तिच्याच आजोबांच्या बंद घरात नेले. तिथे त्याने चिमुकलीवर अत्याचार केले. या घटनेने चिमुकली पूर्णपणे घाबरली होती. तिने कसतरी नराधमाच्या तावडीतून पळ काढला आणि आपली सुटका करून घेतली होती.
आरोपी अटकेत
तिने हा सगळा प्रकार आपल्या घरी जाऊन रडत रडत आपल्या आईला सांगितला. चिमुकलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी आरोपी तुळशीराम इंगळे याला लालवंडी येथून अटक केली आहे. आरोपीवर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात पोलिसांनी पुढील तपास केला आहे. आता पुन्हा एकदा महिला, चिमुकली आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होताना दिसत आहे.
नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ गोळीबाराचा थरार; 24 तासांत पोलिसांची मोठी कारवाई, दोन्ही गटांतील 10 आरोपी अटकेत
नांदेडमधून गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. लंगर साहेब गुरुद्वारा (नगीना घाट) परिसरात दोन गटात वाद झाला होता. याच वादातून गोळीबाराची खळबळजनक घटना घडली होती. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. पोलिसांनी वेगाने आपली चक्रे फिरवत अवघ्या २४ तासांच्या आत दोन्ही गटातील एकूण १० आरोपींना अटक केली आहे. परिसरात तणावाची परिस्थती नियंत्रणात आणली आहे.
दोन्ही बाजूने गुन्हा दाखल
गोळीबार प्रकरणी दोन्ही बाजूने परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका गटातर्फे हॉटेल चालक कमलप्रितसिंग सिंधु यांनी फिर्याद दिली की, यात्रेकरूंसोबत सुरु असलेला वाद सोडवण्यासाठी गेले होते. एका ३० ते ३५ वर्षीय यात्रेकरुने त्यांच्यावर पिस्तूल झाडून जखमी केले. यावरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाला.
तर दुसऱ्या बाजूने पंजाबमधील रहिवासी लवप्रीतसिंग चहल यांनी फिर्याद दिली की, जुन्या वादाचा राग मनात धरून स्थानिकांनी त्यांच्यावर तलवारी आणि काठ्यांनी हल्ला केला.
Ans: तुळशीराम विठ्ठल इंगळे (वय ६०) या नराधमाने केला अत्याचार.
Ans: पीडितेच्या आजोबाच्या बंद घरात घडली.
Ans: पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला आहे.






