
Solapur Crime: शिक्षणासाठी आणलेल्या मेहुणीवर बिघडली नियत; अनैतिक संबंधांच्या त्रिकोणातून जावयाचा भयंकर शेवट!
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, किसन गडहिरे असे हत्या झालेल्या ३२ वर्षीय जावयाचे नाव आहे. किसन याचे लग्न झाल्यानंतर त्याने आपल्या पहिल्या पत्नीच्या लहान बहिणीला (मेहुणीला) उच्च शिक्षणासाठी स्वतःच्या घरी आणले होते. मात्र, यादरम्यान त्याची नियत बिघडली आणि त्याने मेहुणीशी जवळीक साधत तिच्याशी थेट विवाह केला. आपल्याच मेहुणीशी दुसरं लग्न केल्यामुळे किसनची पहिली पत्नी, सासरे अतुल कसबे आणि मेहुणे यांच्या मनात त्याच्याविरोधात तीव्र संताप निर्माण झाला होता. कुटुंबीयांचा या बेकायदेशीर लग्नाला मोठा विरोध होता.
या वादातून मंगळवारी रात्री किसन गडहिरे आणि कसबे कुटुंबीयांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात किसन गडहिरे याने थेट आपले सासरे अतुल कसबे आणि आपल्या मेहुण्यावर तलवारीने वार करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. तो आपल्या मेहुण्याला मारण्यासाठी त्याच्या मागे धावत होता. आपल्या मुलावर आणि स्वतःवर झालेला जीवघेणा हल्ला पाहून संतापलेल्या सासरे अतुल कसबे यांनी मध्यस्थी करत किसनच्या डोक्यात मोठा दगड घातला आणि त्यानंतर त्याच्या हातातील तलवारीनेच त्याच्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात जावई किसन गडहिरे रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
पती, पहिली पत्नी आणि मेहुणी यांच्यातील अनैतिक संबंधांच्या त्रिकोणातून सासऱ्याच्या हातूनच जावयाचा अशा प्रकारे भयंकर शेवट झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सासऱ्याला ताब्यात घेऊन पोलीस पुढील कसून तपास करत आहेत.
Ans: मृत जावयाने पहिल्या पत्नीच्या लहान बहिणीशी (मेहुणीशी) दुसरं लग्न केल्याच्या रागातून आणि कौटुंबिक वादातून ही हत्या घडली.
Ans: हत्येप्रकरणी मृत जावयाचे नाव किसन गडहिरे तर आरोपी सासऱ्याचे नाव अतुल कसबे आहे.
Ans: मंगळवेढा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.