crime (फोटो सौजन्य: social media)
सोलापूरच्या कुमठे गावातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या गावातील एका तलावात बुडून तेरा महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत्यूच्या घटनेनंतर कुटुंबियांसह कुमठे गावात एकच शोककळा पसरली आहे. बाळाच्या आई वडिलांनी त्याचा अंत्यसंस्कार करून बाळाला पुरलंय. मात्र बाळाच्या मामला या घटनेवर संशय आला आणि त्याने पोलिसांकडे तक्रार करत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
बाळाच्या मामाने ११२ वर फोन करून आक्षेप घेतला. ही मृत्यू अनैसर्गिक असल्याचे सांगितले आहे. मामाच्या तक्रारीनंतर या बाळाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि तो मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या मृत्यूच कारण समजेल. मृत्यू झालेल्या बाळाचा नाव विश्वनाथ नीलकंठ मामुरे असे आहे.
आई वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार काल रविवारी (१३ जुलै) सकाळी १० वाजता विश्वनाथ खेळात होता. त्यावेळी खेळतांना तो बुडाला आणि मृत्यू झाला. त्यामुळे संध्याकाळी 4 वाजता आम्ही विधिवत मुलावर अंत्यसंस्कार केले. मात्र या घटनेची कोणतीही माहिती न देता आई वडिलांनी परस्पर अंत्यकार केल्याने बाळाच्या मामाला संशय आला. बाळाच्या मामा स्वप्नील धर्मराज भरमचीने १२२ वर कॉल केला आणि पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह रात्री बाहेर काढला. सध्या पुढील कारवाईसाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार अशी माहिती पोलिसांनी दिली. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजणार आहे.या घटनेने एक खळबळ उडाली आहे.
दरम्यान,दुसरीकडे पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला पुण्यातील बुधावर पेठेत जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बांगलादेशमधून कामाच्या निमित्ताने भारतात आणलेल्या एका अल्पवयीन मुलीला पुण्यातील बुधावर पेठेत जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिला ब्युटी पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. मात्र, नंतर दलाल व्यक्तींनी तिला बुधवार पेठेतील कुंटणखान्यात ठेवले. तसेच, वेश्याव्यवसायासाठी जबरदस्तीही केली. नकार दिल्यानंतर या तरुणीला पट्ट्याने मारहाण करण्यात आली. एका सामाजिक संस्थेने हा प्रकार समोर आणत पोलिसांच्या मदतीने तरुणीची सुटका केली आहे.
अल्पवयीन मुला-मुलींसह 100-150 जण ताब्यात; मॅरेज इव्हेंटच्या नावाने सुरु होते…, पोलिसांची मोठी कारवाई