अमरावती शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमरावती येथील शंकरनगर परिसरात एका हॉटेलमध्ये तरुणाईची मद्यपार्टी सुरु होती. शंबर ते दीडशे तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये अधिक अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश आहे. हॉटेल मध्ये फेक मॅरेज इव्हेंटचा 5 दिवसीय आयोजन करून इथे अल्पवयीनाना मद्य सर्व करण्यात येत होते. ही कारवाई 13 जुलैला रात्री नऊच्या सुमारास हॉटेलमध्ये गुन्हे शाखा युनिट 2 ने केली आहे.
Karad Crime News : कराडमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण; नेमकं काय घडलं?
नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या शंकर नगर परिसरात एका हॉटेल मध्ये फेक मॅरेज इव्हेंट पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत सुमारे अल्पवयीनांसह 100 ते 150 तरुण होते. या पार्टीत अल्पवयीन मुली मुलांना दारू सर्व केली जात आहे अशी माहिती गुन्हे शाखा युनिट २ ला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 2 चा पथक रात्रीच्या 9 च्या सुमारास तेथे पोहोचले आणि थेट तिथे धाड टाकली. इथे जवळपास अल्पवयीनांसह पोलिसांनी100 ते 150 तरुण तरुणींना ताब्यात घेतले.
ही कारवाई उशिरा रात्री 12 वाजेपर्यंत करण्यात आली. 18 वर्षाखाली मुला-मुलींना पिण्यासाठी दारू दिली जात असल्यामुळे हॉटेल मालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रमुख संदीप चव्हाण व एपीआय महेश कुमार इंगोले यांच्या पथकाने ही कारवाई केली. हॉटेल मालक, आयोजकांसह त्या तरुण-तरुणींना राजापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. 18 वर्षाच्या खाली असलेल्या मुलं व मुलींना बार यामध्ये दारू देणे व पुरवणे कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असून संबंधित हॉटेल मालकावर कारवाई करण्यात आली आहे.
त्यांची वैधकीय तपासणी करिता त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी कारवाईदरम्यान काही युवकांचीच वैद्यकीय तपासणी केली. तर अनेकाची वैद्यकीय तपासणी न करता तेथूनच पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.या घटनेने अमरावती शहरात एकच खळबळ उडाली. पार्टीत दारू ड्रग चा पुरवठा केला का हा प्रश्न उपस्तीथत होत आहे. या दबंग कारवाईने मात्र अमरावती शहरात एकच खळबळ उड़ली आहे.
दरम्यान, पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिल्यानंतर बिल न देताच निघून जाणाऱ्या तरूणाच्या घरी हॉटेल कामगारांनी फोन करून बिलाची माहिती दिली. नंतर मात्र तरुणाने घरी का सांगितले याचा राग मनात धरत त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा हॉटेलमध्ये येऊन सुरक्षा रक्षकावर धारदार हत्याराने वार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक! तरुणीला जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकलले; बुधवार पेठेत नेले अन्…