Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: पतीच्या छळाला कंटाळली; 10 महिन्यांच्या मुलीची हत्या करून आई थेट मृतदेह खांद्यावर घेऊन पोलीस ठाण्यात

सोलापूरच्या बार्शीत पतीच्या कथित छळाला कंटाळून एका 26 वर्षीय महिलेने आपल्या 10 महिन्यांच्या मुलीची गळा दाबून व पाण्याच्या बादलीत बुडवून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मोठ्या मुलीचीही हत्या करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तिच्या आर्त विनवणीमुळे तिचा जीव वाचला. आरोपी आईने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 21, 2026 | 08:45 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पतीच्या कथित छळामुळे आईने 10 महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप.
  • 6 वर्षांच्या मुलीचीही हत्या करण्याचा प्रयत्न; तिच्या विनवणीमुळे जीव वाचला.
  • आरोपी महिलेविरुद्ध BNS कलम 103(1) आणि 109 अंतर्गत गुन्हा दाखल.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्याच १० महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर ६ वर्षाच्या मोठ्या मुलीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र आई, मी शाळा शिकते, मला मारू नकोस, अशी आर्त हाक आणि विनवणी मुलीने करताच तिचा जीव वाचला. महिलेने हे टोकाचे पाऊल पतीच्या छळाला कंटाळून उचलल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यांनतर महिला चिमुलीला खांद्यावर घेऊन थेट पोलिस ठाण्यात हजर झाली. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत घडली आहे.

सातारा तालुका पोलिसांची धडक कारवाई; कंटेनरमधून तब्बल 1.98 कोटींच्या बनावट गोवा दारूचा साठा जप्त

काय घडलं नेमकं?

आरोपी महिलेचे नाव पूजा योगेश खुर्दामळे (वय 26) असे आहे. पूजाने आपल्या पतीच्या छळाला कंटाळून आपल्या १० महिन्याच्या चिमुकलीची हत्या केली. तिचा गळा दाबून तिला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार मारले. मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव शक्ती असे आहे. त्यांनतर तिने आपल्या ६ वर्षाच्या मुलीला देखील गळा दाबण्याचा आणि तोंडावर उशी दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, आई मी शाळा शिकते, मला मारु नकोस,” असे म्हंटल आणि त्या महिलेने सोडून दिली. मोठ्या मुलीचे नाव तेजल असे आहे. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यांनतर आरोपी महिला मृत चिमुकलीला खांद्यावर घेऊन थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली. माझ्या पतीच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलीची हत्या केली आहे. मला अटक करा, अशी कबुली पोलिसांसमोर तिने दिली आहे. हे भयंकर कृत्य पूजाने वडील कामावर गेल्यानंतर केले.

बार्शी शहर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 (1) आणि 109 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती एवढी का वाढत चालली आहे, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे. एका आईनेच आपल्या पोटच्या मुलीचा जीव घेणं ही अत्यंत हृदयद्रावक आणि समाजमनाला हादरवून टाकणारी घटना आहे. या प्रकरणाचा नेमका तपास सुरू असून, या टोकाच्या निर्णयामागील कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.

Pune Crime : जावयासोबत रचला मालकाला लुटण्याचा डाव; बॅग हिसकावून पळाले अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बार्शी, सोलापूर जिल्ह्यात.

  • Que: मृत चिमुकलीचे वय किती होते?

    Ans: 10 महिने.

  • Que: आरोपी महिलेने काय केले?

    Ans: मुलीची हत्या केल्यानंतर ती स्वतः मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Solapur crimea mother killed her 10 month old daughter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Solapur-Mumbai Air Service Suspended Again: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा ‘ब्रेक’! Star Airचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?
1

Solapur-Mumbai Air Service Suspended Again: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा ‘ब्रेक’! Star Airचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
2

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
4

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.