सौजन्य - नवराष्ट्र टीम
सातारा : सातारा तालुका पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शिवथर गावाच्या हद्दीत धडक कारवाई करत कंटेनरमधून बनावट गोवा निर्मित दारू जप्त केली आहे. या कारवाईत दारूसह कंटेनर आणि मोबाईल असा एकूण १ कोटी ९८ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रेमकुमार जनकधारी सिंग (वय ५८, रा. पारशी रोड, रुतमाजी, कोसीपुरा, कोलकाता) याला अटक केली असून सुरेंद्र शर्मा (रा. दिल्ली) हा संशयित फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शिवथर परिसरातून टाटा कंपनीच्या कंटेनरमधून मोठ्या प्रमाणावर बनावट गोवा दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शनिवारी (दि. १९) सायंकाळी सुमारे ७ वाजता सातारा–फलटण मार्गावरील शिवथर येथे आरजे-१४ जीआर-०५३९ क्रमांकाचा कंटेनर अडवला.
वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली असता १ कोटी ५६ लाख २८ हजार ८०० रुपयांची बनावट गोवा दारू, सुमारे ४२ लाख रुपयांचा कंटेनर तसेच २० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण १ कोटी ९८ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास सातारा तालुका पोलिसांकडून सुरू असून, दारूचा साठा नेमका कोठून आणण्यात आला होता आणि तो कुठे पोहोचविण्यात येणार होता, याचा तपास केला जात आहे.
हे सुद्धा वाचा : एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न, नवले पुलाजवळ थरार; नेमकं काय घडलं?
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.
हे सुद्धा वाचा : जावयासोबत रचला मालकाला लुटण्याचा डाव; बॅग हिसकावून पळाले अन्…
तुकाराम मुंढेंचा मोठा दणका
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून संपूर्ण राज्यभरात भेसळयुक्त आणि अस्वच्छ अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. याच धडाकेबाज कारवाईचा पुढचा टप्पा आता मुंबईत पाहायला मिळाला आहे. १३ जुलै २०२६ रोजी एफडीएच्या पथकाने केलेल्या अचानक तपासणीत अन्नसुरक्षेचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबईतील भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील तीन नामांकित हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.






