Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime News: जळगावात सैराटची पुनरावृत्ती; प्रेमविवाह केल्याच्या रागातून जावयाला संपवलं

लग्नाला तीन-चार वर्षे लोटूनही पूजाच्या माहेरच्यांकडून  सातत्याने वाद निर्माण केले जात होते. अनेकदा हे वाद पोलिसांपर्यंतही गेले.  पूजाच्या घरचे वारंवार तिला आणि मुकेशला जीवे मारण्याच्या धमक्याही देत होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 21, 2025 | 10:22 AM
Jalgaon Crime News: जळगावात सैराटची पुनरावृत्ती; प्रेमविवाह केल्याच्या रागातून जावयाला संपवलं
Follow Us
Close
Follow Us:

जळगाव:  बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.  या घटनामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालेलं असतानात आता जळगावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून जळगावात जावयाची निर्घृण हत्या केली आहे. मुकेश शिरसाट असे हत्या झालेल्या 26 वर्षीय तरूणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगावात शोककळा पसरली आहे.  या  प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  पाच वर्षांपूर्वी मुकेश शिरसाट आणि पुजा सोनावणे यांचे प्रेमसंबंध जुळले होते. दोघेही जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या हुडको भागातील रहिवासी होते.मुकेश आणि पुजा यांनी यांनी 4 फेब्रुवारी 2022 रोजी  प्रेमविवाह केला. पण पूजाच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हंत. घरच्यांच्या विरोधात जाऊन पुजाने मुकेशसोबत लग्न केल्याने तिच्या कुटुंबियांच्या त्यांच्यावर राग होता. मुकेश हातमजुरी करून संसार चालवायचा. तर पुजाही घरकाम करून संसाराला हातभार लावत होती.

लवकरच लाँच होणार Nothing Phone 3! मिळणार iPhone चं हे फिचर; किती असेल किंमत?

दुसरीकडे लग्नाला तीन-चार वर्षे लोटूनही पूजाच्या माहेरच्यांकडून  सातत्याने वाद निर्माण केले जात होते. अनेकदा हे वाद पोलिसांपर्यंतही गेले.  पूजाच्या घरचे वारंवार तिला आणि मुकेशला जीवे मारण्याच्या धमक्याही देत होते. पण कौटुंबिक वादामुळे पोलिसांनी कोणतीही कठोर भूमिका न घेता दोन्ही कुटुंबियातील संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. पण मुकेशच्या काटा काढायचाच हे पूजाच्या माहेरच्यांच्या डोक्यात होते. सोमवारी (20 जानेवारी) मुकेश कामासाठी घरातून बाहेर पडला असतानाच पूजाच्या कुटुंबियांनी  मुकेशवर धारधार शस्त्राने वार केले. मुकेशला वाचवण्यासाठी गर्भवती पूजाने घरातून बाहेर धाव घेतली तर तिच्यावरही वार करून तिलाही संपवण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे हल्लेखोरांनी मुकेशच्या कुटुंबियांवरही हल्ला केला. सुदैवाने पूजा बचावली.   पण आपल्याच माहेरच्यांनी मुकेशची हत्या केली आणि आपल्यावरही वार केले,असा आरोप पूजाने केला आहे.

सोमवारी नेमंक घडलं काय?

मुकेश आणि त्याच्या सासरच्या नातेवाईकांमध्ये 18 जानेवारीच्या संध्याकाळी वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले, पण रविवारी सकाळी सुमारे 8.30 वाजता, मुकेश कामासाठी घराबाहेर पडत असताना, त्याच वेळी हातात लाठ्या-काठ्या आणि धारदार शस्त्रं घेऊन मुकेशच्या सासरचे काही लोक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला.

स्मार्टफोनचा डेटा प्लॅन संपायला आलाय? आताच या टीप्स फॉलो करा, रिचार्ज करण्याची गरज नाही

नणंदेने वाचवला पूजाचा जीव
मुकेशला वाचवण्यासाठी काही लोक पुढे सरसावले, पण जमावाने त्यांच्यावरही हल्ला चढवला. दरम्यान, मुकेशची गर्भवती पत्नी पूजा हिच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पूजाची नणंद वेळीच घटनास्थळी पोहोचली आणि तिच्या हस्तक्षेपामुळे गर्भवती पूजा या हल्ल्यातून बचावली.

मुकेशची त्याच्याच घरासमोर सासरच्या लोकांनी हत्या केल्यामुळे  जळगावात शोककळा पसरली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या चार ते पाच जणांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुकेश आणि पूजा यांना तीन वर्षांची मुलगी असून पूजा गर्भवती आहे. अशा परिस्थितीत मुकेशची हत्या झाल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हल्लेखोरांनी केलेल्या अमानवी कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. मुकेशच्या बहिणीने हल्लेखोरांना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. तिने न्यायासाठी आवाज उठवताना, दोषींना फाशीची शिक्षा देण्याचा आग्रह धरला आहे.

Web Title: Son in law killed in anger over love marriage in jalgaon nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 09:46 AM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
1

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

दारू पिण्यास पैसै न दिल्याने आईच्या खुनाचा प्रयत्न; मुलाने छातीत चाकू भोसकला अन्…
2

दारू पिण्यास पैसै न दिल्याने आईच्या खुनाचा प्रयत्न; मुलाने छातीत चाकू भोसकला अन्…

खडसेंच्या जावयाच्या अडचणीत वाढ, सायबर पोलिस ठाण्यात महिलेने दिली तक्रार; नेमकं प्रकरण काय?
3

खडसेंच्या जावयाच्या अडचणीत वाढ, सायबर पोलिस ठाण्यात महिलेने दिली तक्रार; नेमकं प्रकरण काय?

आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
4

आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.