Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारू पिण्यास पैसै न दिल्याने आईच्या खुनाचा प्रयत्न; मुलाने छातीत चाकू भोसकला अन्…

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाने आईवर चाकूने वार केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसाहतीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 16, 2025 | 04:52 PM
दारू पिण्यास पैसै न दिल्याने आईच्या खुनाचा प्रयत्न; मुलाने छातीत चाकू भोसकला अन्...

दारू पिण्यास पैसै न दिल्याने आईच्या खुनाचा प्रयत्न; मुलाने छातीत चाकू भोसकला अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. दररोज खून, मारामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. पुण्यातही गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटना घडत आहेत. अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाने आईवर चाकूने वार केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसाहतीत घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

कौशल्या पप्पू कांबळे (वय ५५, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे महिलेचे नाव आहे. या प्रकणी कौशल्या यांचा मुलगा कृष्णा (वय ३०) याला अटक केली आहे. याबाबत कृष्णाचा मोठा भाऊ बाबासाहेब (वय ३६) याने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी कृष्णा कांबळे याला दारु पिण्याचे व्यसन आहे. तो काही कामधंदे करत नाही. तो दारू पिण्यासाठी सतत पैशांची मागणी करुन आईला त्रास देत होता. पैसे न दिल्याने त्याने आईला शिवीगाळ केली. गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने आाई कौशल्या यांच्यावर चाकूने वार केले. छातीत चाकूने भोसकला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या कृष्णा याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख अधिक तपास करत आहेत.

लातूरच्या सांगवीतील खळबळजनक घटना

लातूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहरे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे मुलाने वयोवृद्ध आईचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमीन विक्रीच्या वादातून ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुमिंद्रबाई जाधव (वय 70) यांच्या नावे असलेली शेती विकावी, असा आग्रह त्यांचा मुलगा काकासाहेब जाधव (वय 48) मागील काही दिवसांपासून धरत होता. मात्र आईने ठाम नकार दिल्याने रागाच्या भरात काकासाहेबने 7 ऑगस्ट रोजी शेतातच आईचा तोंड दाबून आणि गळा आवळून आईचा खून केला. त्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात पुरून टाकला. सदर घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांचा तपास सुरू झाला. आई आणि मुलांमध्ये शेतजमीन विकण्यावरून वाद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुलगा काका साहेबचा शोध सुरू झाला. मात्र काकासाहेबचा तपास लागला नाही. रेणापूर शिवारात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत काकासाहेब जाधवचा मृतदेह आढळून आला.

Web Title: An incident of a son beating his mother has taken place in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 04:52 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रकांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1

वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रकांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

661 कोटींच्या हेराफेरीप्रकरणी मोठी धरपकड! चंदीगड ते दिल्ली- NCR पर्यंत CBI ची छापेमारी, प्रकरण काय?
2

661 कोटींच्या हेराफेरीप्रकरणी मोठी धरपकड! चंदीगड ते दिल्ली- NCR पर्यंत CBI ची छापेमारी, प्रकरण काय?

६ हजारांची नोकरी अन् घरात दडवलं होतं कोट्यवधींचं ‘काळं साम्राज्य’; ओडिशातील इंजिनिअरच्या मालमत्तेने उडवली सर्वांची झोप
3

६ हजारांची नोकरी अन् घरात दडवलं होतं कोट्यवधींचं ‘काळं साम्राज्य’; ओडिशातील इंजिनिअरच्या मालमत्तेने उडवली सर्वांची झोप

पाटस पोलिस ॲक्शन मोडवर; गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड
4

पाटस पोलिस ॲक्शन मोडवर; गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.