Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कर्जतच्या स्थानिक पत्रकारावर जीवघेणाा हल्ला करण्याचा प्रयत्न काहींना केला होता त्यातील तीन आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश आलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 16, 2025 | 08:18 PM
Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Follow Us
Follow Us:

कर्जत/संतोष पेरणे :  कर्जत येथील पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला प्रकरणी कर्जत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.या हल्ल्याप्रकरणी 14 दिवसांनी पोलीस हल्लेखोर यांच्यापर्यंत पोहचले असून आणखी तीन आरोपींचा शोध कर्जत पोलिस घेत आहेत. दरम्यान या घटनेप्रकरणी कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी पोलीस उप अधिक्षक यांची भेट घेऊन पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला प्रकरणी कर्जत येथे पोलिस उप अधिक्षक राहुल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी कर्जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप भोसले यांच्या सह घटनेची माहिती दिली एक ऑगस्ट २०२५ रोजी पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे सहकारी मयूर रणदिवे ह्यांच्यावर चार फाटा परिसरात काही अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला होता.

लोखंडी रॉड , फायटर आणि सापळा पद्धतीने केलेल्या ह्या हल्ल्यात पत्रकार प्रथमेश कुडेकर यांना गंभीर दुखापत झाली होती. राहुल गायकवाड यांनी माहिती देताना कर्जत पोलीस ठाणे येथील पोलिसांनी अधिक तपास करून काही तांत्रिक मुद्द्यांद्वारे घटनास्थळ परिसर , खोपोली , खालापूर , चौक , नेरळ आणि द्रुतगती मार्गासह , शेडुंग टोलनाका परिसरातील असंख्य सीसीटीव्ही तपासून या गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले.

या गुन्ह्यात आत्तापर्यंत कर्जत आणि महाड ह्या परिसरातून एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित चार आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. अटक केलेल्या तीन आरोपीना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आणि १५ ऑगस्ट रोजी आरोपींना जामीन मिळालेला आहे.आरोपींनी गुन्ह्याकरिता वापरलेली एक मोटारसायकल आणि एक मारुती वॅगन आर कार जप्त करण्यात आलेली आहे.

या गुन्ह्याच्या तपासात कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे , पोलिस उप निरीक्षक सुशांत वरक,पोलिस उप निरीक्षक किरण नवले , पोलीस हवालदार स्वप्नील येरुणकर , पोलीस हवालदार समीर भोईर,पोलिस नाईक प्रवीण भालेराव,विठ्ठल घावस,पोलीस हवालदार सागर शेवते हे करीत आहेत.

कर्जत तालुक्यातील या प्रकरणामुळे पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला हा एका पत्रकारावर झालेला हल्ला असून त्या बाबतचा गुन्हा पत्रकार हल्ला विरोधी कायद्या अंतर्गत दाखल व्हावा अशी मागणी केली.त्या मागणीचे निवेदन कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी पोलीस उप अधिक्षक राहुल गायकवाड यांना सादर केले.

Web Title: Karjat news police succeed in the case of attack on local journalist three accused in police custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 08:18 PM

Topics:  

  • crime news
  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
1

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
2

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
3

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
4

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.