...अन् चेहऱ्यावर आलं हासू; चोरीस गेलेला 49 लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत
नाशिकरोड : नाशिक विभागामधील नाशिकरोड पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या दिवसा व रात्री घरफोडीसह इतर गुन्हे घडले. यामध्ये दुचाकी चोरी, सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, सोने-चांदीचे दागिने चोरी आदी गुन्ह्यांचा तपास करून आरोपींकडून जप्त केलेला चोरीचा मुद्देमाल हा मूळ फिर्यादींना परत करण्यात आला.
नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यासंदर्भात आदेश दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने बुधवारी (दि.30) पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ चे किशोर काळे, नाशिकरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकरोड पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याकडील फिर्यादींना त्यांचा चोरी गेलेला मुद्देमाल वाटप करण्यात आला.
हेदेखील वाचा : Pranjal Khewalkar News : मोबाईमध्ये आक्षेपार्ह चॅट्स, मुलींचे फोटो…; एकनाथ खडसेंच्या जावयाला जामीन मिळणार?
दरम्यान, नाशिकरोड पोलीस ठाणेकडील १४ गुन्ह्यामधील एकूण ३२ लाख १४ हजारांचा, उपनगर पोलीस ठाणेकडील एकूण ११ गुन्ह्यांमधील १४ लाख १३ हजारांचा तर देवळाली कॅम्प पोलीस ठाणेकडील विविध गुन्हयांमधील चोरी झालेला एकूण ३ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत करण्यात आलेला आहे.
मुद्देमाल परत मिळताच पोलिसांचे मानले आभार
यावेळी मुद्देमाल परत मिळालेल्या फिर्यादींनी नाशिक पोलिसांचे आभार मानले. सदर कार्यक्रम पोलीस उप-आयुक्त किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिकरोड विभागाचे डॉ. सचिन बारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलिस उपनिरीक्षक विलास कोटमे, हवालदार विष्णू गोसावी, उपनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ, हवालदार साळवे, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बागूल यांनी यशस्वीरित्या पार पाडला.
हेदेखील वाचा : Pranjal Khewalkar: मोठी बातमी! ड्रग्ज प्रकरणात प्रांजल खेवलकरांना कोर्टाचा दिलासा, जामिनाचा मार्ग मोकळा?