
crime (फोटो सौजन्य: social media)
रायगड: एका शेतकऱ्याचे बैल चोरीला गेले असता बैलाची तक्रार घेऊन गेलेल्या शेतकऱ्यालाच पोलिसांनी “बैलाचा जन्मदाखला आणा” असा प्रश्न विचारला. या विचारलेल्या प्रश्नाने सर्वच स्तरांवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ही अचंबित करणारी घटना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंजप गावातील तानाजी माळी यांच्यासोबत घडली आहे. या शेतकऱ्याच्या घराच्या अंगणातून रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांचा बैल पळवून नेल्याची घटना घडली.
सीसीटीव्ही मध्ये काय?
बैल चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. फुटेजमध्ये तीन ते चार गोतस्कर पावाचे तुकडे टाकून बैलाला घराच्या अंगणातून बाहेर खेचत नेत असल्याचं दिसतं. त्यांनतर त्यांनी बैलाला एका आलिशान वाहनात बसवलं आणि पळ काढला. सकाळी उठल्यावर त्यांना बैल कुठेही दिसला नाही. त्यांना बैल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ नेरळमधील कशेळे पोलीस चौकीत तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. तिथे पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर ते कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली तेव्हा तिथे त्यांना आणखी विचित्र अनुभव आला.
कर्जत पोलिसांनी त्यांना विचारलं, “बैलाचा जन्मदाखला आहे का? दाखला आणा मग तक्रार घेतो!” हा विचित्र प्रश्न ऐकून शेतकरी चक्रावून गेला. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. “बैल चोरीला गेला, पोलिसांकडे तक्रार द्यायला गेलो तर ते जन्मदाखला मागतात! मग न्याय मागायचा कुणाकडे?” असा सवाल स्थानिक शेतकरी संतापाने विचारत आहेत.
पोटच्या पोरांनीच केली आई-वडिलांची निर्दयी हत्या, कुजलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावात एक हत्येची घटना समोर आली आहे. एका वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पद मृतदेह त्यांच्याच घरी आढळून आले होते. याप्रकरणाची तपास पोलीस तपास करत होते. या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. यांची हत्या दुसरं तिसरं कोणी नाही तर त्यांच्याच पोराने हत्या केल्याचे समोर आले आहे. आईवडील आपल्याला घरखर्च देत नाहीत, घरात राहू देत नाहीत याच रागातून हत्या दोन्ही मुलांनी केली. या घटनेने रायगड जिल्हा हादरला आहे.
Pune Crime: चिकन सेंटरच्या आडून गांजाची विक्री; पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, एक जण अटकेत