Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात खळबळ: काँग्रेसच्या माजी उपसरपंचाचा शिंदे गटात प्रवेश

रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच अलिबाग तालुक्यातील मापगावचे काँग्रेसचे माजी उपसरपंच वसीम कुर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 06, 2026 | 12:56 PM
Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात खळबळ: काँग्रेसच्या माजी उपसरपंचाचा शिंदे गटात प्रवेश

Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात खळबळ: काँग्रेसच्या माजी उपसरपंचाचा शिंदे गटात प्रवेश

Follow Us
Follow Us:
  • रायगडच्या राजकारणात खळबळ 
  • माजी उपसरपंचाचा कॉंग्रेसला रामराम 
  • वसीम कूर हे समर्थकांसह शिवसेनेत दाखल 
 

Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात जिल्हा परिषदेच्या तोंडावर खळबळ उडाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच अलिबाग तालुक्यातील मापगावचे काँग्रेसचे माजी उपसरपंच वसीम कुर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, आवास रायगड जिल्हा परिषदेचे उमेदवार दिलीप उर्फ छोटम भोईर यांच्या उपस्थितीत सोगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मापगाव ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर, मुदस्सर कुर, किफायत कुर तसेच चोरोंडे येथील श्याम परब, जगदीश मल्हार, केतन परब व इतर अनेक कार्यकर्ते यांनी पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे आमदार महेंद्र दळवी यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन शिवसेना पक्षात स्वागत केले.

हे देखील वाचा: Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात भूकंप! मनसे महाविकास आघाडीतून पडली बाहेर

आवास जिल्हा परिषदेचे उमेदवार दिलीप भोईर यांनी पक्षप्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात विशेष सन्मान राखला जाईल, असे सांगितले. तसेच रायगड जिल्हा परिषदेचे उमेदवार दिलीप भोईर यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून विजयी करणार असल्याचे शेवटी सांगितले. आमदार महेंद्र दळवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “सोगावचे माझ्यावर विशेष प्रेम असून माझ्या जडणघडणीत या सोगाव गावाने मला प्रत्येकवेळी मोलाची साथ दिली आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवसेना (शिंदे गट) उमेदवार दिलीप भोईर व किहीम पंचायत समिती गणाच्या उमेदवार स्नेहा रुत यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे, त्यामुळे या सर्व जागा मागील निवडणुकीपेक्षा यावेळी छोटमशेठ चार पटीने निवडून येणार, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

हे देखील वाचा: Matheran News : विकेंडला माथेरानला फिरायला जाताय? महत्त्वाची बातमी समोर, ई रिक्षा 10 फेब्रुवारी पासून बंद, कारण काय?

अलिबागमध्ये राजकीय उलथापालथ झाल्याने कॉंग्रेसला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राजकीय समीकरण बदल्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवसेना (शिंदे गट) यांची ताकद वाढल्याची दिसून येत आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली गटबंधन होताना दिसून येत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Raigad zp elections ex congress leader wasim kur joins shiv sena shinde faction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • Congress
  • Politics
  • raigad
  • Raigad News
  • shivsena

संबंधित बातम्या

Raigad News: जनतेचा विरोध असेल तर बल्क ड्रग पार्क नकोच; सुनील तटकरेंची स्पष्ट भूमिका
1

Raigad News: जनतेचा विरोध असेल तर बल्क ड्रग पार्क नकोच; सुनील तटकरेंची स्पष्ट भूमिका

Maharashtra Drought 2026: पावसाने दडी मारली, कर्जतवर दुष्काळाचे सावट; हजारो हेक्टरवरील भातपीक धोक्यात
2

Maharashtra Drought 2026: पावसाने दडी मारली, कर्जतवर दुष्काळाचे सावट; हजारो हेक्टरवरील भातपीक धोक्यात

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार
3

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार

RAIGAD: एकाच ठिकाणी नागरिकांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ; ‘सेवा संकल्प’ अभियानाला प्रतिसाद
4

RAIGAD: एकाच ठिकाणी नागरिकांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ; ‘सेवा संकल्प’ अभियानाला प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.