चिकन सेंटरच्या आडून गांजाची विक्री
पोलिसांनी 1.3 किलो गांजा जप्त केला
आरोपी सलीम शेख अटकेत
पुणे: पुणे ग्रामीण पोलीस दलाने दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावात अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. एक चिकन सेंटरच्या नावाखाली अवैधरित्या गांजाची विक्री सुरु होती. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सलीम आदम शेख असे आहे.
लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वारंवार अत्याचार; विविध लॉजमध्ये बोलवायचा अन्…
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून पोलिसांना तब्बल 1 किलो 383 ग्रॅम वजनाचा विक्रीस बंदी असलेला गांजा आढळून आला आहे. बाजारभावानुसार जप्त करण्यात आलेल्या या गांजाची अंदाजित किंमत २० हजार 745 रुपये इतकी आहे. पोलिसांनी हा संपूर्ण गांजाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे चालवत मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांना संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे.
मी पण आयपीएस अधिकारी आहे अस सांगत मारल्या बाता! कोणत्या बॅचचा आहे विचारल्यावर पडलं पितळ उघड
पुणे शहरात सातत्याने काही ना काही घटना या फसवणुकीच्या पाहायला मिळतात. अनेक जण सरकारी नोकरी लावून देतो अस सांगत आर्थिक फसवणूक करतात किवा अधिकारी असल्याच सांगत कागदपत्रांची अफरातफर करताना आपण पाहील आहे. पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पुण्यातील पोलीस आयुक्तालयात एक जण आयपीएस अधिकारी आहे अस सांगत आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटला आणि माझे मित्र पण आयपीएस आहेत अस सांगितलं. कोणत्या बॅचचा आहे अस विचारल्यावर त्याच पितळ उघड पडलं आणि तो बोगस अधिकारी असल्याचं समोर आल. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर वाघमोडे अस या बोगस अधिकाऱ्याच नाव आहे. तो मूळचा हा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील रहिवाशी आहे. तो पुणे पोलीस आयुक्तालयात गेला आणि या जाळ्यात अडकला. वरिष्ठ पोलिसांना तो नक्की का भेटला? याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर बाता मारत असताना त्याच्यावर संशय आला आणि त्याला सध्या ताब्यात घेण्यात आल आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ बंडगार्डन पोलिसांत बोलवून घेतलं आणि ताब्यात दिल आहे. त्याच्यावर आता पोलीस चौकशी करत आहेत.






