Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: म्हसळा राजकारण तापलं! राष्ट्रवादीला रोखण्यासाठी पक्षांची हातमिळवणी, शेकाप-उबाठा-शरद पवार गट एकत्र

म्हसळा तालुक्यात यापूर्वी पंचायत समिती ही राष्ट्रीय काँग्रेसची एका हाती सत्ता होती. मात्र आता पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये म्हसळा तालुक्यात तिरंगी लढत चुरशीची पाहण्यास मिळत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 06, 2026 | 02:43 PM
Raigad News: म्हसळा राजकारण तापलं! राष्ट्रवादीला रोखण्यासाठी पक्षांची हातमिळवणी, शेकाप-उबाठा-शरद पवार गट एकत्र

Raigad News: म्हसळा राजकारण तापलं! राष्ट्रवादीला रोखण्यासाठी पक्षांची हातमिळवणी, शेकाप-उबाठा-शरद पवार गट एकत्र

Follow Us
Follow Us:
  • म्हसळा तालुक्यात तिरंगी लढतीची चुरस
  • राष्ट्रवादीला रोखण्याकरता शेकाप-उबाठा-शरद पवार गट एकत्र
  • गावागावात पाठिंबासाठी धावपळ सुरू
म्हसळा: जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये म्हसळा तालुक्यात तिरंगी लढत चुरशीची पाहण्यास मिळत आहे. एका बाजूला शिवसेना आरपीआय तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी-भाजपा, तिसरीकडे मशाल, तुतारी, खटारा अशा तिरंगी लढतीमध्ये राजकारणाच्या सारीपाटाचा खेळ सुरू झाला असला तरी या ठिकाणी सर्वच उमेदवारांची राजकीय ताकद पणाला लावत आहेत.

शुभ मंगल सावधान! मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुलांची लग्न होणार तरी कधी?

तालुक्यात यापूर्वी पंचायत समिती ही राष्ट्रीय काँग्रेसची एका हाती सत्ता होती. तेव्हापासून राष्ट्रवादीने तालुक्यातील गावात विविध विकास कामातून आपली बाजू मजबूत केली होती. त्यानंतर शिवसेना एकत्र होती. शिवसेना फुटीनंतर शिंदे गटाची शिवसेना यांनी तालुक्यात देखील विकासकामाचा झंझावात सुरू केला. आपली देखील ताकद अजमावण्याचं काम यावेळी शिंदे शिवसेना करत आहे. त्याचबरोबर आता होणाऱ्या जिल्हा परिषद राष्ट्रवादीचे युवा उमेदवार भास्कर विचारे यांचे चिरंजीव अभिषेक विचारे त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे कुणबी समाज युवा प्रसाद बोरले तर दुसरे कुणबी समाजाचे उबाठाचे रोशन पारावे अशी तिरंगत असून येथे उमेदवार तरुण असल्याने आपल्या डिजिटल प्रचाराचा उपयोग करत आहेत. तरी या गटामध्ये राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणात ताकद आहे. शिंदे गटाचे प्रसाद बोलले आणि देखील स्टार प्रचारक नियोजन करून गावागावात पाठिंबासाठी धावपळ सुरू आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

पांगलोळीतील कुणबी समाजाच्या मताला महत्व

शिवसेनेचे रोशन पारावे देखील मशाल घेत शेकापचा खटारा सोबत मैत्री करत त्यांनी देखील शिवसेनेच्या स्टाईलमध्ये प्रचार करत आपली बाजू भक्कम करीत आहेत. तालुक्यातील सर्वच गटांपेक्षा सर्वांचे लक्ष मात्र पांगलोळी गटाकडे लागले आहे. कारण एका बाजूला राष्ट्रवादी उपाध्यक्ष उद्योजक समाजसेवक सुनिल तटकरे यांचे निकटवर्तीय भास्कर दाजी विचारे यांचे चिरंजीव अभिषेक विचारे व दुसरीकडे शिवसेनेचे प्रसाद बोरले पण कुणबी समाजाचे असल्याने त्यांना देखील समाजाची सहानुभूती मिळते की कर्स? हे देखील पाहणे तितकेच गरजेचे आहे.

गावभेटीचा दौरा, प्रचाराची खेळी आली अंतिम टप्यात

राष्ट्रवादी आपली ताकद पणाला लावत आपला गड कसा शाबूत ठेवता येईल? त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते विकासकामांवर प्रचार करत आहेत. साळविडे सणात राष्ट्र‌वादीचे माजी कृषी सभापती बबन मनवे तर शिवसेना शिंदे गटाचे अमोल पैढारी उबाठाचे कृष्णा म्हात्रे, पांगगोली गणामध्ये शिवसेनेच्या स्यिा पाटेकर, उबाठाचे चैतन्या गजमल, राष्ट्रवादीच्या प्रियंका निबरे, पंचायत समिती खरसई गणामध्ये शिवसेनेचे महेश पाटील, उबाठाचे रमेश खोत, राष्ट्रवादीचे लहू म्हात्रे है रणांगणात असून पाभरे गणामध्ये राष्ट्रवादीचे समृद्धी चाचले, शिवसेनेच्या अमिता जाधव तर शेकापच्या ज्योती गीजे अशी लढत आहे.

ठाणे सिटीझन फोरमचा लढा ठरला यशस्वी…ट्रस्टला मिळाली ११६ कोटींची जमीन परत

सोशल मीडियावर विविध उमेदवारांचे स्टार प्रचारक

प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी आपले नाते संबंध, समाजमाध्यमांचा वापर करून घराघरात प्रचार केला. गणांमध्ये उमेदवारांमध्ये चुरशीची लढत शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी याच्यामध्ये दिसणार आहे. शेकापचे वर्चस्व जरी गावामध्ये नसले तरी उमेदवारांच्या नाती मैत्री ही तसं बंद समाज सर्व गोष्टीचा वापर शेकाप शिवसेना करत असल्याचे चित्र समोर दिसत आहे. त्यामुळे यावर्षीच्या जिल्हा परिषदेचे निकाल काय असतील? हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे, आज प्रचार काळ संपला असला तरी मात्र सोशल मीडियावर आपले स्टार प्रचारक प्रचार करत आहेत. या सर्व प्रक्रियेवर निवडणूक आयोग आपली भिंगाचा चष्मा लावत कडकी नजर ठेवत आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे मेंदडी गट

तर मेंदडी गटामध्ये शेकापचे माजी तालुका चिटणीस आगरी समाजाचे माजी उपाध्यक्ष संतोष पाटील हे उभे असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे अनिल बसवत शिवसेनेचे अकमल कादिरी या तिघांमध्ये लढत सुरू आहे. हा गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने शेकापचे संतोष पाटील शिवसेनेचे अकमल कादरी याना आपली ताकद पणाला लावली लागणार आहे. यापूर्वी या विभागातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते. परंतु आता शेकापचे उमेदवार उबाठा सोबत मैत्री करत राष्ट्रवादीला रोखण्याचे काम करत आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Opposition unites to challenge ncp triangular contest heats up in mhasla taluka raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Election
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना
1

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी
2

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक;  दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन
3

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक; दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

एकदा वापरून फेकायचे नाही! भारत बनवणार Reusable Rocket; अग्निकुलला २०० कोटींची मदत
4

एकदा वापरून फेकायचे नाही! भारत बनवणार Reusable Rocket; अग्निकुलला २०० कोटींची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.