Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पतीने पोलिसांना एक खोटी माहिती दिली; पण चार वर्षांनी त्याच माहितीचा तपास करताना पोलिसांसमोर जे सत्य आले, ते थरकाप उडवणारे होते. तपासाची दिशा बदलताच पती-पत्नीचा तब्बल तीन हत्यांशी संबंध असल्याचा दावा समोर आला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 02, 2026 | 04:56 PM
Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

Follow Us
Follow Us:
  • पत्नीला अडकवण्यासाठी खोटी माहिती दिल्याचा पतीवर आरोप
  • ड्रममध्ये सिमेंट भरून मृतदेह पुरल्याचा धक्कादायक प्रकार
  • पती-पत्नीच्या सहभागातून तीन हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा
 

पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर तिला आणि तिच्या नातेवाईकांना हत्येच्या प्रकरणात अडकवण्यासाठी पतीने पोलिसांना खोटी माहिती दिल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे. मात्र, या माहितीच्या आधारे सुरू झालेला तपास पुढे जात असताना पोलिसांसमोर धक्कादायक सत्य उघड झाले. या प्रकरणात पती-पत्नीचाच तब्बल तीन हत्यांशी संबंध असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी माधवदास भक्तिराम साधू आणि त्याची विभक्त पत्नी उर्मिला ऊर्फ जया माधवदास साधू यांना पोलिसांनी अटक केली आहे. मृतांमध्ये उर्मिलाची आजी, तिची बहीण आणि माधवदासची आई यांचा समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा: आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये; आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’ला थेट ठोकले सील

पत्नीला अडकवण्यासाठी खोटी माहिती?

ही घटना सुरत शहराशी संबंधित असून, २०२२ मध्ये अहमदाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या डिटेक्शन युनिटला सुरतजवळील कोसंबा येथे शांता वसावा यांची हत्या करून त्यांचा मृतदेह घरात पुरल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका पुरुष नातेवाईकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, त्याचा या प्रकरणाशी संबंध आढळला नाही. त्यानंतर पोलिसांचा संशय माधवदासकडे वळला. पोलिस तपासानुसार, माधवदास आणि उर्मिला मागील सुमारे आठ महिन्यांपासून विभक्त राहत होते. उर्मिला घरातून जाताना दागिने आणि रोख रक्कम घेऊन गेल्याने माधवदास तिच्यावर नाराज होता. याच कारणातून तिला आणि तिच्या नातेवाईकांना हत्येच्या प्रकरणात गोवण्यासाठी त्याने खोटी माहिती दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.

ड्रममध्ये सिमेंट भरून मृतदेह पुरल्याचा आरोप

चौकशीदरम्यान पोलिसांना या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती मिळाल्याचे सांगण्यात येते. माधवदास आणि उर्मिला यांच्या सहभागातून तीन हत्या झाल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. २०२२ मध्ये शांता वसावा यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह ड्रममध्ये ठेवून त्यात सिमेंट भरण्यात आले. त्यानंतर हा ड्रम खड्ड्यात पुरल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान पोलिसांनी जमिनीखाली पुरलेला मृतदेह कायदेशीर प्रक्रियेनुसार बाहेर काढला आहे.

हेही वाचा: कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

आजी, बहिणीसह सासूच्या हत्येचा तपास

उर्मिलाची बहीण भगवती कमलेश वसावा हिला क्षयरोगाचा त्रास होता. पोलिसांच्या तपासानुसार, तिच्या तोंडावर उशी दाबून हत्या करण्यात आली आणि मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. याशिवाय माधवदासची आई आणि उर्मिलाची सासू मंजुळा भक्तिराम साधू हिलाही अर्धांगवायूचा गंभीर आजार होता. तिचीही उशी दाबून हत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घाईघाईने अंत्यसंस्कार केल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येते.

तीन हत्यांमागील नेमका हेतू काय?

या प्रकरणात तीन हत्या उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून मिळालेली माहिती, पुरावे आणि मृतदेहांचे अवशेष यांची पडताळणी सुरू केली आहे. तिन्ही हत्यांमागे नेमका काय हेतू होता, हत्यांमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का आणि पुरावे नष्ट करण्यासाठी नेमक्या कोणत्या पद्धती वापरण्यात आल्या, याचा तपास सुरू आहे. चार वर्षांपूर्वीच्या एका खोट्या माहितीपासून सुरू झालेला तपास थेट तीन हत्यांपर्यंत पोहोचल्याने या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Surat triple murder case husband wife arrested wife framing conspiracy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • crime news
  • murder case news

संबंधित बातम्या

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई
1

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
2

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…
4

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.