Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bengaluru Crime: पत्नीच्या चारित्र्यावर संशय; भररस्त्यात अडकवत गोळ्या झाडून केली हत्या, नंतर थेट पोलीस ठाण्यात केले सरेंडर

बंगळुरूमध्ये 40 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत रस्त्यात अडवून चार गोळ्या झाडत हत्या केली. घटनेनंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन शरणागती पत्करली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 24, 2025 | 01:33 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पत्नी बँकेत कामावरून घरी परतत असताना गोळीबार
  • दीड वर्षांपासून पती-पत्नी वेगळे राहत होते
  • हत्या केल्यानंतर आरोपी पतीची पोलीस ठाण्यात शरणागती
बंगळुरू: बंगळुरूमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर त्याने थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर केले. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. हत्या करणारा ४० वर्षीय सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे. त्याने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

Uttarpradesh Crime: शिकवणीच्या नावाखाली घाणेरडा प्रकार! मौलवीकडून 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

काय घडलं नेमकं?

भुवनेश्वरी (39) ही ‘यूनिअन बँक ऑफ इंडिया’च्या बसवेश्वरननगर ब्रांचमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होती. ती कामावरून घरी परतत असतांना आरोपी पती बालामुरुगनने तिला संध्याकाळी 6.30 ते 7 च्यादरम्यान, मगाडी रोडजवळ तिला वाटेत थांबवलं आणि त्याने आपल्या पत्नीवर पिस्तूलमधून चार गोळ्या झाडात हत्या केली. भुवनेश्वरी ही गंभीररीत्या जखमी होऊन जमिनीवर कोसळली आणि तिला तातडीने शानबाग रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पोहोचल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले.

दोघे राहत होते वेगळे

आरोपी आणि मृत महिलेचं लग्न २०११ मध्ये झालं होत. त्यांना दोन मुलं सुद्धा आहे. लग्नानंतर काही महिन्यात त्यांच्यात सतत वाद होऊ लागले आणि त्यामुळे ते जवळपास १८ महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. पतीपासून दूर राहण्यासाठी पीडित भुवनेश्वरी सहा महिन्यांपूर्वी व्हाइटफील्ड येथील राजाजीनगरमध्ये शिफ्ट झाली. एका आठवड्यापूर्वीच आरोपी बालमुरूगनने भुवनेश्वरीपासून घटस्फोट मिळवण्यासाठी तिला कायदेशीर नोटीस देखील पाठवली होती. आरोपीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातून त्याने हत्या केल्याचे समोर आले आहे.

गुन्हा दाखल

आरोपी हा एका प्रायव्हेट आयटी फर्ममध्ये काम करत होता. मात्र मागील चार महिन्यांपासून त्याला कुठेच काम न मिळाल्याने तो बेरोजगार होता. पत्नीच्या हत्येनंतर, आरोपी बालामुरुगन मगाडी रोड पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि आपला गुन्हा कबूल केला. एवढेच नाही तर हत्याकारण्यासाठी वापरण्यात आलेली पिस्तूल सुद्धा त्याने पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी त्याच्यावर BNS सेक्शन 103 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

Mumbai Cyber Crime: ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली 85 वर्षीय निवृत्त शिक्षकाची 9 कोटींची फसवणूक; साताऱ्यातील तरुण अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: मंगळवारी संध्याकाळी बंगळुरूच्या मगाडी रोड परिसरात ही घटना घडली.

  • Que: हत्येचं कारण काय सांगितलं जात आहे?

    Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय आणि वैवाहिक वाद हे मुख्य कारण असल्याची माहिती आहे.

  • Que: आरोपीविरोधात कोणती कारवाई झाली आहे?

    Ans: पोलिसांनी आरोपीविरोधात BNS सेक्शन 103 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Suspecting his wifes character a man stopped her on a busy street

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 01:33 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Uttarpradesh Crime: शिकवणीच्या नावाखाली घाणेरडा प्रकार! मौलवीकडून 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत
1

Uttarpradesh Crime: शिकवणीच्या नावाखाली घाणेरडा प्रकार! मौलवीकडून 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

Mumbai Cyber Crime: ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली 85 वर्षीय निवृत्त शिक्षकाची 9 कोटींची फसवणूक; साताऱ्यातील तरुण अटकेत
2

Mumbai Cyber Crime: ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली 85 वर्षीय निवृत्त शिक्षकाची 9 कोटींची फसवणूक; साताऱ्यातील तरुण अटकेत

Sangli Cyber Crime: 37 जणांची बँक खाती भाड्याने घेऊन सायबर फसवणूक; 22 वर्षीय आरोपी अटकेत
3

Sangli Cyber Crime: 37 जणांची बँक खाती भाड्याने घेऊन सायबर फसवणूक; 22 वर्षीय आरोपी अटकेत

Latur Crime: नशेत असलेल्या पतीचा पत्नीने केला खून! आधी डोके भिंतीवर आपटले, नंतर गळा आवळला; धक्कादायक कारण उघड
4

Latur Crime: नशेत असलेल्या पतीचा पत्नीने केला खून! आधी डोके भिंतीवर आपटले, नंतर गळा आवळला; धक्कादायक कारण उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.