काय घडलं नेमकं?
पीडितेच्या कुटुंबियांच्या पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हंटले आहे की, रामपूर येथे राहणाऱ्या मौलवी यासीन हा मुलीला धार्मिक शिक्षण देत होता. मुलगी धार्मिक शिक्षण घेण्यासाठी मौलवीकडे नेहमी जात होती. तिच्या 14 वर्षीय मुलीवर एका मौलवीने लैंगिक अत्याचार केला होता. जेव्हा पीडितेनं याबाबतची माहिती तिच्या कुटुंबाला सांगितली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. मौलवीच्या सहकाऱ्यांनी तिला अनेकदा धमकावले देखील होते. पण तिला शांत राहण्याऐवजी कोणताही पर्याय नव्हता.
आरोपीला अटक?
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत मौलवी यासीन, त्याचा चुलत भाऊ शकील, पुतण्या आणि आठ जणांविरोधात एफआरआय दाखल केला आहे. पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली मौलवी यासीनच्या मुसक्या आवळल्या आहे. दरम्यान, पोलीस आता इतर काही आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
आठवीच्या मुलीची छेडछाड; आरोपी अल्पवयीन, पोलिसांनी थेट चार मुलांच्या आईलाच केली अटक!
उत्तरप्रदेश येथील बदायू येथून एक अनोखी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलांनी मुलीची छेड काढली, म्हणून पोलिसांनी आरोपींच्या आईला अटक केल्याचे समोर आले आहे. चांगले संस्कार दिले नाही असे म्हणत पोलिसांनी आईलाच अटक केल्याचे समोर आले आहे. या महिलांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आणि सब डिविजनल मॅजिस्ट्रेटसमोर हजर केले. कोर्टाने त्यांना खाजगी जातमुचलक्यावर जामीन दिला आहे.
काय नेमकं प्रकरण?
पीडित मुलीची काही मुले छेड काढत होते. तिने घडलला हा सगळा प्रकार आपल्या वडिलांना सांगितले. त्यांनतर कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठत या मुलांविरोधात
पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकारी अजय पाल सिंह म्हणाले की, हे आरोपी अल्पवयीन असून अल्पसंख्यांक समुदायातून येतात, ते शाळेत जात नाहीत, दिवसभर परिसरात फिरत राहतात. आरोपी मुले आणि पीडित मुलगी एकमेकांना वैयक्तिक ओळखत नाहीत. हे आरोपी अल्पवयीन आहेत म्हणून पोलिसांनी त्यांच्या आई वडिलांना नोटीस पाठवली होती. मुलांचे व्यवस्थतीत संगोपन न करणे आणि चांगले संस्कार न दिल्याबद्दल पोलिसांनी आरोपींच्या आईला अटक केली आहे. मुलांवर संस्कार करण्यास ते अयशस्वी ठरले त्यामुळे पोलिसांनी आईला अटक केली.
Ans: मौलवीने केला अत्याचार
Ans: धार्मिक शिक्षणासाठी जात होती.
Ans: आरोपींनी धमकी देण्यास सुरुवात केली.






