crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
तामिळनाडू येथून ऑनर किलिंगची थरारक घटना घडल्याचे समोर आले आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संतापलेल्या बापाने जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना तामिळनाडूमधील डिंडीगुल जिल्ह्यात नीळकोट्टई परिसरात घडली आहे. मृत्य झालेल्या व्यक्तीचे नाव
रामचंद्रन (वय 24) असं आहे. तो एका डेअरीमध्ये काम करत होता. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून,परिसरात भीतीचे वातावरण आहे.
नेमकं काय प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र याची ओळख गणपतीपट्टी येथील आरतीशी कामाच्या निमित्ताने झाली होती. या ओळखीच रूपांतर प्रेमसंबंधात झालं आणि गेल्या तीन वर्षांपासून दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांनी समाजाच्या विरोधाची पर्वा न करता काही महिन्यांपूर्वी लग्न केलं होत. मात्र आरतीच्या कुटुंबीयांनी हे लग्न अजिबात मान्य नव्हतं. तिच्या वडिलांनी अनेकदा रामचंद्रनला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या असं आरतीचं म्हणणं आहे.
कशी केली हत्या?
लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत असल्याचं या जोडप्याला वाटलं. मात्र, रविवारी सकाळी रामचंद्रन कुलिपट्टी गावाकडे कामावर जात असतांना, आरतीचे वडील चंद्रन यांनी त्याचा रस्ता अडवला. जातीय अहंकार आणि रागाच्या भरात त्यांनी धारदार शस्त्राने वार करत रामचंद्रनचा घटनास्थळीच खून केला.
तपास सुरु
पोलिसांच्या माहितीनुसार, आरती कल्लर समाजातील असून रामचंद्रन नायक समाजाचा होता. जो तामिळनाडूमधील मागासवर्ग (BC) मध्ये मोडतो. जातीच्या नावावर झालेल्या या क्रूर हत्येमुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच नीळकोट्टई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं. पोलिसांनी आरोपी चंद्रनला ताब्यात घेतलं आहे. मात्र आरतीचा आरोप आहे की या खुनामागे इतर काही लोकांचाही हात आहे. सर्व आरोपींना अटक होईपर्यंत ती पतीचा मृतदेह स्वीकारणार नाही, असा तिचा निर्धार आहे. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पहिले दिली मिठाई, नंतर चिरला गळा, तामिळनाडूत बापानं तीन मुलांची केली निर्घृण हत्या
तामिळनाडू येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. बापाने आपल्या तीन निष्पाप मुलांचा गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. येवढेच नाही तर हत्या केल्यानंतर स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. आरोपीची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहू लागल्यामुळे त्याने संतापाच्या भरात हत्या केल्याचे कबूल केले आहे. ही घटना पत्तुकोट्टईजवळील पेरियाकोट्टई गावात घडली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे.