छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक हत्येची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून एका २५ वर्षीय तरुणावर धारदार शास्त्राने वार करत हत्या करण्यात आल्या आहे. शुभम रणवीर सिंह राजपुत असे मृत तरुणाचे नाव आहे. गल्लीत अपरात्री आलेल्या तरुणाला हटकल्याचा राग मनात धरून मुख्य आरोपीने पोरं गोळा करत तरुणाला धारधार शास्त्राने हल्ला करत संपवले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. ही घटना संभाजीनगरच्या कन्नडमध्ये नागद गावात मंगळवारी रात्री सडे आठच्या सुमारास घडली आहे.
नोकरीच्या आमिषाने मामेभावालाच गंडा; तब्बल 12 लाखांची केली फसवणूक
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल दशरथ निकम, सचिन दशरथ निकम, शंकर दशरथ निकम, ऋषी गोविंद निकम, अविनाश गोविंद निकम, बंडू शिवसिंह राजपूत आणि सतीश संतोष राजपूत असे सात आरोपींची नावे आहेत. मंगळवारी रात्री शुभम हा ग्रामपंचायतीकडेजाणाऱ्या रस्त्याने जात असतांना डीपीजवळ आरोपी तरुणांनी त्याच्यावर हल्ला चढवला. यात २५ वर्षीय तरुणाची मृत्यू झाली.
का करण्यात आली हत्या?
मुख्य आरोपी अमोल निकम हा रात्री उशिरा गल्लीत येऊन एका व्यक्तीकडे थांबत होता. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार शुभमने केली होती. त्याचप्रमाणे त्याने अमोलला यापूर्वीही हटकले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून अमोल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शुभमला धडा शिकवायचा ठरवले. मंगळवारी रात्री शुभम गावातील रस्त्याने जात असताना अमोल आणि इतरांनी त्याला अडवून धारदार शस्त्राने मानेवर आणि शरीरावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात शुभम कोसळला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
तपास सुरु
घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर नागद परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून गावात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शाळेच्या निर्जनस्थळी जाणं जीवावर बेतलं, मैदानावर तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हत्या झाल्याचे समोर आले आहे. शहरातील एसएफएस शाळेच्या मैदानावर तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या झालेला ३० वर्षीय सुरेश भगवान उंबरकर हा आम्लेटच्या दुकानावर काम करत होता. ही घटना जालना रोडवरील एसएफएस शाळेच्या मैदानावर घडली आहे. मात्र सुरेशची हत्या कोणी केली आणि का केली? याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस करीत आहे.
चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ‘या’ परिसरात सापळा रचून तिघांना पकडले