Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तासगाव पोलिसांकडून सराईत चोरट्यास अटक; 25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

शयित मिरजे हा संशयितरित्या दिसून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ अर्धवट तुटलेले सोन्याचे दागिने मिळून आले. या दागिन्याविषयी तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. अधिक चौकशी केली असता त्याने दागिने चोरीची कबुली दिली

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 29, 2025 | 03:06 PM
तासगाव पोलिसांकडून सराईत चोरट्यास अटक; 25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

तासगाव पोलिसांकडून सराईत चोरट्यास अटक; 25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

Follow Us
Follow Us:
तासगाव : तासगाव, कराड, विटा, खालापूर व शिरोली हद्दीतील जबरी चोरी व चेन स्नॅचिंग प्रकरणातील सराईत गुन्हेगारास पकडण्यात तासगाव पोलिसांना यश आले. शीतल मारुती मिरजे (वय ३२, रा. शिंदेवाडी, ता. कवठेमहांकाळ) असे संशयितांचे नाव आहे. त्याच्याकडून २५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी माध्यमांना दिली. यावेळी उपअधीक्षक सचिन थोरबोले, निरीक्षक सोमनाथ वाघ व गुन्हे प्रकटीकरणचे पथक उपस्थित होते.
घुगे म्हणाले, तासगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसका मारून चोरी करण्याचे प्रकार घडले होते. त्या अनुषंगाने तपास सुरू होता. यादरम्यान हवालदार अमर सूर्यवंशी यांना विटा नाका, चिंचणी नाका, शिवाजी चौक परिसरात गस्तीवर असताना संशयित चोरटा दुचाकीवरून येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सूर्यवंशी व पथक घटनास्थळी गेले. यावेळी संशयित मिरजे हा संशयितरित्या दिसून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ अर्धवट तुटलेले सोन्याचे दागिने मिळून आले. या दागिन्याविषयी तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. अधिक चौकशी केली असता त्याने दागिने चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने नऊ गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून २८० ग्रॅम वजनाचे २३ लाख ५९२ किमतीचे सोन्याचे दागिने, दोन दुचाकी, असा २५ लाख ५९२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. या पथकात सुहास खुबीकर, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव, योगेश जाधव, पवन जाधव, आरती खोत यांचा समावेश होता. उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे तपास करीत आहेत.
पुण्यातील औंध भागात घरफोडी
औंध भागातील सानेवाडी ओझन मॉल परिसरातील एका सोसायटीतल बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत ७५ वर्षीय ज्येष्ठाने तक्रार दिली आहे. सोमवारी रात्री हा प्रकार समोर आला आहे. तक्रारदार रविवारी सायंकाळी घराला कुलूप लावून गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. घरातील रोकड व दागिने असा ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरला.
विमाननगर परिसरातही चोरीची घटना
विमाननगर परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी तब्बल दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली असून, या चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे.

Web Title: Tasgaon police arrested in thief nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 03:06 PM

Topics:  

  • crime news
  • sangli news

संबंधित बातम्या

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं
1

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!
2

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
3

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!
4

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.