Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur Crime News: शतपावलीसाठी घराबाहेर पडले अन् गोळ्या झाडून संपवलं! राजकीय वैमनस्यातून झाला खुन

Pandharpur Crime News: पंढरपुरात शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजा भिंगे यांची गोळ्या झाडून हत्या! सुरुवातीच्या दोन आरोपींच्या चौकशीतून फुटलं बिंग अन् पंढरपूर पोलिसांच्या विशेष पथकाने थेट गुजरातच्या अहमदाबादमधून तिघांच्या आवळल्या मुसक्या!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 20, 2026 | 02:59 PM
Pandharpur Crime News: शतपावलीसाठी घराबाहेर पडले अन् गोळ्या झाडून संपवलं! राजकीय वैमनस्यातून झाला खुन

Pandharpur Crime News: शतपावलीसाठी घराबाहेर पडले अन् गोळ्या झाडून संपवलं! राजकीय वैमनस्यातून झाला खुन

Follow Us
Follow Us:
  • पंढरपुरात शतपावलीवेळी जिल्हाध्यक्ष राजा भिंगे यांची गोळ्या झाडून हत्या
  • अहमदाबादमधून तिघा फरार आरोपींना अटक; एकूण ५ जण ताब्यात
  • राजकीय वैमनस्यातून खून; चौकशीतून गुजरात कनेक्शन उघड
Pandharpur Crime News: सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर शहरात शिवा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजा भिंगे यांचा गोळीबार करून खून करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. शहरात राजकीय वजन असलेल्या नेत्याची अशाप्रकारे हत्या झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या हत्याकांडाचा छडा लावण्यात पंढरपूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून, फरार असलेल्या तीन आरोपींना गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अटक आरोपींची एकूण संख्या पाचवर पोहोचली आहे.

हेही वाचा: PMC Action: दबाव आणाल तर फोटोसह नाव जाहीर करणार; पुणे महापालिका आयुक्तांचा थेट इशारा!

शतपावलीसाठी बाहेर पडताच गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री राजा भिंगे हे रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते. याच संधीचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी गोळीबार करत त्यांची हत्या केली. या थरारक घटनेनंतर पंढरपूर शहर व परिसरात एकच खळबळ उडाली होती.

चौकशीतून उघड गुजरात कनेक्शन

राजा भिंगे यांच्या हत्येनंतर पंढरपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सुरुवातीलाच दोन आरोपींना पंढरपुरातून ताब्यात घेत अटक केली होती. या दोन्ही आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, गुन्ह्यात सहभागी असलेले उर्वरित तीन आरोपी गुजरातमध्ये पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार पंढरपूर पोलिसांचे एक विशेष पथक तात्काळ गुजरातला रवाना झाले आणि अहमदाबाद येथून तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

हेही वाचा: Weapon Attack: आधी कार ट्रकला धडकवली अन् मग धारदार शस्त्राने वार! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पतीचे भयंकर कांड…

राजकीय वैमनस्यातून हत्या 

जुन्या राजकीय वैमनस्यातून राजा भिंगे यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर या हत्येमागील नेमका कट आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पंढरपूर पोलिसांकडून सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंढरपुरात कोणाची आणि कशाप्रकारे हत्या करण्यात आली?

    Ans: शिवा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजा भिंगे हे मंगळवारी रात्री जेवणानंतर शतपावलीसाठी घराबाहेर पडले असताना हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांचा खून केला.

  • Que: या प्रकरणात आतापर्यंत किती आरोपींना अटक झाली आहे?

    Ans: या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला पंढरपुरातून दोघांना अटक केल्यानंतर, फरार असलेल्या तिघांना गुजरातच्या अहमदाबादमधून अटक करण्यात आली.

  • Que: राजा भिंगे यांचा खून कोणत्या कारणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे?

    Ans: जुन्या राजकीय वैमनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.

Web Title: Pandharpur murder three accused arrested ahmedabad gujarat sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pandharpur crime

संबंधित बातम्या

जायकवाडी कालव्यात फेकलेल्या श्यामचाही मृतदेह सापडला; दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा
1

जायकवाडी कालव्यात फेकलेल्या श्यामचाही मृतदेह सापडला; दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा

सावंगी बायपासवरील लुटमारीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
2

सावंगी बायपासवरील लुटमारीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखोंचा जनसागर
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखोंचा जनसागर

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून हत्या; पतीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून हत्या; पतीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.