Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकाला शेअर मार्केटमध्ये 1.81 कोटीचे नुकसान; आधी पत्नीसह दोन मुलांना आईस्क्रीममधून विष दिलं अन् नंतर स्वत:..

योगेशला शेअर बाजारात सुमारे १ कोटी ८१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या आर्थिक धक्क्यातून ते सावरू शकले नाहीत आणि त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 13, 2026 | 08:40 AM
शिक्षकाला शेअर मार्केटमध्ये 1.81 कोटीचे नुकसान; आधी पत्नीसह दोन मुलांना आईस्क्रीममधून विष दिलं अन् नंतर स्वत:..

शिक्षकाला शेअर मार्केटमध्ये 1.81 कोटीचे नुकसान; आधी पत्नीसह दोन मुलांना आईस्क्रीममधून विष दिलं अन् नंतर स्वत:..

Follow Us
Follow Us:

सोलापूर : नंदुरबार आणि सोलापूर जिल्ह्याला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शेअर बाजारात पैसे बुडाल्याच्या तणावात नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात कार्यरत असलेल्या शिक्षकाने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीद या त्यांच्या मूळ गावी घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

योगेश बाळासाहेब पाटील (वय ३९), पत्नी माधुरी योगेश पाटील (वय ३७), मोठा मुलगा अथर्व (वय ११) आणि लहान मुलगा शिवांश (वय ९) अशी या घटनेत मृत पावलेल्यांची नावे आहेत. योगेशने गुरुवारी मध्यरात्री पत्नी माधुरी, अथर्व आणि शिवांश यांना आईस्क्रीममधून विष दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिघांचा जीव गेल्यानंतर योगेशने स्वतः गळफास लावून आपले जीवन संपवले.

संबंधित शिक्षक तळोदा भागात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शाळांना सुट्या असल्याने ते पत्नी आणि दोन मुलांसह मूळ गावी आले होते. शिक्षकाने आईस्क्रीममध्ये विष मिसळून प्रथम आपल्या कुटुंबाला दिले, ज्यामध्ये त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.

Pune Crime : आता वाचलीस, पण पुन्हा दिसलीस तर…; पुण्यात महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

विष कशाप्रकारे देण्यात आले आणि ही घटना केवळ आर्थिक दबावातून घडली की यामागे आणखी काही कारणे आहेत, याचा पोलिस कसून तपास करत आहेत. सध्या पोलिस अधिकृत वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत. या भीषण घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

1.81 कोटीचे नुकसान; पैशांची मोठी चणचण

योगेशला शेअर बाजारात सुमारे १ कोटी ८१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या आर्थिक धक्क्यातून ते सावरू शकले नाहीत आणि त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

आर्थिक संकटामुळे उचलले टोकाचे पाऊल

प्राथमिक तपासात समोर आले की, संबंधित शिक्षकाला शेअर बाजारामध्ये सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठे नुकसान झाले होते. या प्रचंड आर्थिक संकटामुळे आणि मानसिक तणावामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Web Title: Teacher loses 1 81 crore in the share market committed suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • Barshi Crime
  • Suicide case

संबंधित बातम्या

Barshi Crime News : स्पा मसाज सेंटरच्या आड सुरू होता जुगार अड्डा; पोलिसांची मध्यरात्री धाड, 10 जण अटकेत
1

Barshi Crime News : स्पा मसाज सेंटरच्या आड सुरू होता जुगार अड्डा; पोलिसांची मध्यरात्री धाड, 10 जण अटकेत

धक्कादायक ! नर्सिंगच्या फीसाठी पैसे नाहीत म्हणून विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन
2

धक्कादायक ! नर्सिंगच्या फीसाठी पैसे नाहीत म्हणून विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन

काॅलेज टाॅपर विद्यार्थीने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी संपवले आयुष्य, मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवत उघड केले धक्कादायक कारण
3

काॅलेज टाॅपर विद्यार्थीने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी संपवले आयुष्य, मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवत उघड केले धक्कादायक कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.