Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Suicide News: ‘त्या’ चिठ्ठीने उघड केले हॉटेल मालकांचे काळे कारनामे! बीडमध्ये मॅनेजरच्या आत्महत्येने खळबळ

Beed Suicide News: बीड तालुक्यातील चौसाळा येथील 'हॉटेल जानकी'चे मॅनेजर सतीश जाधव यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने खळबळ उडाली आहे! पोलिसांना त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली असून त्यातून हॉटेल मालकांच्या भयंकर छळाचे सत्य समोर आले आहे. नक्की काय लिहिले होते त्या चिठ्ठीत?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 25, 2026 | 04:45 PM
Beed Suicide News: 'त्या' चिठ्ठीने उघड केले हॉटेल मालकांचे काळे कारनामे! बीडमध्ये मॅनेजरच्या आत्महत्येने खळबळ

Beed Suicide News: 'त्या' चिठ्ठीने उघड केले हॉटेल मालकांचे काळे कारनामे! बीडमध्ये मॅनेजरच्या आत्महत्येने खळबळ

Follow Us
Follow Us:
  • हॉटेल जानकी’चे मॅनेजर सतीश जाधव यांची मालकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या
  • मयताच्या खिशात मालकांच्या त्रासाचा स्पष्ट उल्लेख असणारी चिठ्ठी सापडली
  • पत्नीच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलिसांकडून दोन्ही आरोपी मालकांवर गुन्हा दाखल
 

Beed Suicide News: बीड तालुक्यातील चौसाळा येथून एक अत्यंत धक्कादायक आणि हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. स्थानिक ‘हॉटेल जानकी’चे मॅनेजर सतीश जाधव यांनी हॉटेलच्याच एका खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. हॉटेल मालक आणि त्यांच्या भावाकडून सुरू असलेल्या सततच्या मानसिक व आर्थिक छळाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश जाधव हे चौसाळा येथील ‘हॉटेल जानकी’मध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होते. मागील काही काळापासून हॉटेल मालक दशरथ थोरात आणि त्यांचा भाऊ विकी थोरात हे ग्राहकांच्या उधारीच्या पैशांवरून व इतर व्यावसायिक कारणांवरून सतीश यांच्यावर सतत दबाव टाकत होते. उधारीच्या वसुलीवरून त्यांना वारंवार शिवीगाळ करणे आणि अपमानास्पद वागणूक देणे सुरू होते. या सततच्या त्रासामुळे सतीश जाधव तीव्र मानसिक तणावाखाली होते.

हेही वाचा: Crime And Judicial News: मोठा राजकीय-न्यायालयीन भूकंप! ३६ जणांना फाशी देणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली

खिशात सापडली सुसाईड नोट

घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असता, मयत सतीश जाधव यांच्या खिशात एक चिठ्ठी (सुसाईड नोट) आढळून आली. या सुसाईड नोटमध्ये हॉटेल मालक दशरथ थोरात आणि विकी थोरात यांच्या त्रासाचा व छळाचा सविस्तर उल्लेख त्यांनी केला होता. मालकांच्या त्रासाला कंटाळूनच आपण जीवन संपवत असल्याचे त्यांनी स्पष्ट लिहिले होते.

हेही वाचा: Tiger Shroff Firing Case: केवळ गोळीबार की मोठे नेटवर्क टा?यगर श्रॉफ प्रकरणात प्रेयसीच्या एन्ट्रीने उडाली खळबळ!

दोघांवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू

मृत सतीश जाधव यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात हॉटेल मालक दशरथ थोरात आणि विकी थोरात या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या नातेवाईकांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली असून नेकनूर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे आणि कोणत्या हॉटेलमध्ये घडली?

    Ans: ही घटना बीड तालुक्यातील चौसाळा येथील 'हॉटेल जानकी'मध्ये घडली.

  • Que: मॅनेजरच्या आत्महत्येमागे काय कारण समोर आले आहे?

    Ans: हॉटेल मालक दशरथ थोरात आणि विकी थोरात यांच्याकडून उधारीच्या पैशांवरून सुरू असलेला सततचा मानसिक व आर्थिक छळ या आत्महत्येचे कारण ठरले.

  • Que: याप्रकरणी पोलिसांनी कोणावर गुन्हा दाखल केला आहे?

    Ans: नेकनूर पोलिसांनी मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक दशरथ थोरात आणि विकी थोरात यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Beed hotel manager suicide chausala hotel janki satish jadhav sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Beed Case
  • Beed crime News
  • Suicide case

संबंधित बातम्या

Beed Marriage Fraud: आधार कार्डवर वय बदलून लावले लग्न; बीडमधील धक्कादायक प्रकाराने हादरले विवाह मंडळ!
1

Beed Marriage Fraud: आधार कार्डवर वय बदलून लावले लग्न; बीडमधील धक्कादायक प्रकाराने हादरले विवाह मंडळ!

Student Suicide Case: बुधवारच्या त्या दुपारी नेमके काय घडले? शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून ७ व्या वर्गातील विद्यार्थ्याने…
2

Student Suicide Case: बुधवारच्या त्या दुपारी नेमके काय घडले? शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून ७ व्या वर्गातील विद्यार्थ्याने…

Beed Crime News : पतीच्या त्रासाला कंटाळून ३० वर्षीय विवाहितेचे टोकाचे पाऊल; परळीतील घटनेने हळहळ
3

Beed Crime News : पतीच्या त्रासाला कंटाळून ३० वर्षीय विवाहितेचे टोकाचे पाऊल; परळीतील घटनेने हळहळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.