crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
परभणी: परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेच्या सहलीला जाणं एका विद्यार्थिनीला महागात पडल आहे. एका शिक्षकाने विद्यार्थीनीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर शिक्षकाने एआयचा वापर करुन तिचे अश्लील व्हिडीओ बनवले आणि तिला ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष मलसटवाड हा नराधम परभणीतील एका शाळेत शिक्षक आहे. या शाळेने रायगड आणि महाबळेश्वर या ठिकाणी शाळेची सहल काढली होती. दरम्यान, सहलीदरम्यान विकृत मानसिकता असलेल्या संतोषने 16 वर्षीय विद्यार्थीनीचे कपडे बदलत असताना गुपचूप व्हिडीओ काढला. त्यानंतर एआयचा वापर करुन तिचे काही अश्लील व्हिडीओ देखील बनवले. तिला अश्लील फोटो आणि व्हिडीओ सर्वत्र पाठवेन, अशी धमकी देत शिक्षकाने विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. एवढेच नाही तर या प्रकरणात त्याने काही मित्रांचे मदत घेतल्याचे देखील समोर आले आहे.
दरम्यान, घडलेली घटना 16 वर्षीय पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी संतोष मलसटवाड याला ताब्यात घेतलं आहे. संतोष सह चार आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एक अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे.
ओबीसी आरक्षण गमावल्याच्या भीतीने २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या
परभणी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने ओबीसी आरक्षण गमावल्याच्या भीतीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कुमार नारायण आघाव असे असून तो केवळ २२ वर्षाचा आहे. या तरुणाने शेतात जात लिंबाच्या झाडाला गळफास घेतला आहे. त्याच्याजवळ एक चिठ्ठी सापडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच गजानन माणिकराव दराडे यांनी बोरी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. आडगाव दराडे येथील मेव्हणा कुमार नारायणराव आघाव (२२) परभणीहून गावाकडे जातो म्हणून २३ सप्टेंबरला गावाकडे निघाला. घरी आल्यानंतर आईला शेताकडे जातो असे म्हणून गेला तो रात्री उशिरापर्यंत परतला नाही. म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला असता शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या अवस्थेतील मृतदेह आढळला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपासणी केली असता कुमार आघावच्या खिशात चिठ्ठी आढळली.
भांडणात मध्यस्थी करणं तरुणाला भोवलं; चाकूने छातीवर सपासप वार केले अन्…