Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तहसीलदाराला अटक; मुलं होत नाही म्हणून पत्नीचा छळ, जिवे मारण्याची धमकी, जादूटोण्याचा प्रयत्न…

एका क्लास वन ऑफिसरला नांदेड पोलिसांनी अटक केली आहे. ऑफिसर गडचिरोली जिल्ह्यातील धानोऱ्यात कार्यरत असणाऱ्या तहसीलदाराला अटक केल्याने खळबळ उडाली आहे. तहसीलदाराचा नाव अविनाश शेंबटवाड आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 16, 2025 | 12:33 PM
avinash shebadvad (फोटो सौजन्य- social media)

avinash shebadvad (फोटो सौजन्य- social media)

Follow Us
Follow Us:

मूलबाळ होत नसल्यामुळे पत्नीला मारहाण करून तिच्यावरतीच पिस्तूल रोखण्याचा प्रयत्न केला असून जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप तहसीलदारांच्या पत्नीने केला. अटक केलेल्या   असून सध्या ते कोठडीत आहे.

मोठा भाऊ न सापडल्याने लहान भावावर सूड; पूर्ववैमनस्यातून 19 वर्षीय तरुणाची अपहरण करून निर्घृण हत्या

नेमकं काय प्रकरण ?

तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांच्या पत्नीच्या दिलेल्या तक्रारीनुसार, आई- वडिलांनी त्यांचा लग्न दीड वर्षांपूर्वी अविनाश यांच्याशी मोठ्या थाटामाटात लावून दिला होता. लग्नामध्ये सर्वांना मानपान, सोने व अन्य साहित्य देखील दिलं होतं. लग्नानंतर तहसीलदार पती अविनाश यांच्यासह कुटुंबीयांनी त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली. कर्तव्याच्या ठिकाणी सोबत असताना काही ना काही कारण काढून मारहाण करत असत, त्याचबरोबर जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती पिस्तूलही रोखल्याचा दावा अविनाश शेंबटवाड यांच्या पत्नीने केला आहे.

मारहाणीनंतर जादूटोण्याचा प्रयत्न

सासरी मारहाण आणि पतीचा त्रास वाढल्याने अविनाश शेंबटवाड यांची पत्नी नांदेडात माहेरी गेली होती. सासरी असताना मूलबाळ होण्यासाठी जादूटोण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप तिने केला आहे. कौटुंबिक छळासह अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.

न्यायालयीन कोठडी

या प्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तहसीलदार पती अविनाश शेंबटवाड यांच्यासह त्यांची आई, वडील व डाॅक्टर असलेल्या दोन भावांच्या विरोधात देखील कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा 11 मार्च रोजी दाखल करण्यात आला आहे. अविनाश शेंबटवाड हे नांदेडमध्ये असल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना 13 एप्रिल रोजी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

अविनाश शेंबटवाड हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मगनपुरा भागात त्यांचे सासर असून पत्नीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. दीड वर्षांपूर्वी अविनाश यांचे थाटामाटात लग्न झाले.

Web Title: Tehsildar arrested tortured his wife for not having children threatened to kill her attempted witchcraft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 12:33 PM

Topics:  

  • crime news
  • Gadchiroli
  • Nanded

संबंधित बातम्या

कराची हादरलं! १८ महिन्यांच्या चिमुकलीवर १७ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार, उपचाराआधीच मृत्यू; वडिलांनी केली न्यायाची मागणी
1

कराची हादरलं! १८ महिन्यांच्या चिमुकलीवर १७ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार, उपचाराआधीच मृत्यू; वडिलांनी केली न्यायाची मागणी

धक्कादायक ! मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी धमकावून डांबलं अन् नंतर…
2

धक्कादायक ! मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी धमकावून डांबलं अन् नंतर…

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
3

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!
4

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.