Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साकोली पोलिसांची मोठी कारवाई, 6 लाखांचा गांजा जप्त; दोघांना घेतले ताब्यात

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून गांजाची तस्करी करण्याचा प्रयत्न साकोली पोलिसांनी उधळून लावला आहे. चारगाव फाट्यावरील हायवे पॉइंट धाब्यासमोर सापळा रचून पोलिसांनी दोन ट्रॉली बॅगमधून १२ किलो ६५६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 10, 2026 | 01:16 PM
साकोली पोलिसांची मोठी कारवाई, 6 लाखांचा गांजा जप्त; दोघांना घेतले ताब्यात

साकोली पोलिसांची मोठी कारवाई, 6 लाखांचा गांजा जप्त; दोघांना घेतले ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • साकोली पोलिसांनी १२ किलो ६५६ ग्रॅम गांजा जप्त केला
  • गांजाची किंमत ६ लाख ३२ हजार ८०० रुपये 
  • चारगाव फाटा येथील हायवे पॉइंट धाब्यासमोर पोलिसांची कारवाई
साकोली/भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून गांजाची तस्करी करण्याचा प्रयत्न साकोली पोलिसांनी उधळून लावला आहे. चारगाव फाट्यावरील हायवे पॉइंट धाब्यासमोर सापळा रचून पोलिसांनी दोन ट्रॉली बॅगमधून १२ किलो ६५६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ६ लाख ३२ हजार ८०० रुपये किमतीच्या या गांजासह ठाणे येथील साहिल संजय पवार (वय २९) आणि राम मारुती ससाणे (वय ३५) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

गोपनीय माहितीवरून धाब्यासमोर सापळा

चारगाव फाटा परिसरातील हायवे पॉइंट धाब्यासमोर २ व्यक्ती गांजा विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती साकोली पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी पथक तैनात केले. संशयित दोघे तेथे पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा : पोलिसांकडे तक्रार का दिली? म्हणत कोयत्याने वार, तरुण गंभीर जखमी; कळंब तालुक्यातील घटनेनं खळबळ

साकोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी साकोली पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही अशा कारवाया झाल्या आहेत. त्यामुळे जप्त गांजाचा पुरवठा नेमका कोठून झाला, तो कोणाला विक्रीसाठी नेला जात होता आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून अपेक्षीत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पवनीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी आणि साकोलीचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या जोतिका इंगळे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच चाकूने हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: साकोली पोलिसांनी किती गांजा जप्त केला?

    Ans: साकोली पोलिसांनी दोन ट्रॉली बॅगमधून १२ किलो ६५६ ग्रॅम गांजा जप्त केला असून, त्याची किंमत ६ लाख ३२ हजार ८०० रुपये आहे.

  • Que: गांजा तस्करीप्रकरणी कोणाला ताब्यात घेण्यात आले?

    Ans: ठाणे येथील साहिल संजय पवार (वय २९) आणि राम मारुती ससाणे (वय ३५) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • Que: गांजा तस्करीची कारवाई कुठे करण्यात आली?

    Ans: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील चारगाव फाटा परिसरातील हायवे पॉइंट धाब्यासमोर साकोली पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

Web Title: Sakoli police have taken into custody two individuals who were smuggling cannabis nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

पोलिसांकडे तक्रार का दिली? म्हणत कोयत्याने वार, तरुण गंभीर जखमी; कळंब तालुक्यातील घटनेनं खळबळ
1

पोलिसांकडे तक्रार का दिली? म्हणत कोयत्याने वार, तरुण गंभीर जखमी; कळंब तालुक्यातील घटनेनं खळबळ

दारू पिऊन कामावर आला, नोकरी गेली; संतापलेल्या कामगाराने कंपनीलाच आग लावली
2

दारू पिऊन कामावर आला, नोकरी गेली; संतापलेल्या कामगाराने कंपनीलाच आग लावली

दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच चाकूने हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
3

दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच चाकूने हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Shrirampur Clash News: दिवाळीत फटाक्यांवरून तुफान राडा! दोन गटांत दगडफेक, लाकडी दांड्यांनी मारहाण अन् कार पेटवली…
4

Shrirampur Clash News: दिवाळीत फटाक्यांवरून तुफान राडा! दोन गटांत दगडफेक, लाकडी दांड्यांनी मारहाण अन् कार पेटवली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.