राजस्थान येथून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची हत्या करून मृतदेह दुःखाच्या तळघरात पुरल्याचे समोर आले आहे. त्याने सहा दिवस मृतदेह लपवून ठेवल्यानंतर, त्याने पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस आता हत्येमागचा हेतू शोधत आहेत. ही घटना राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात घडली आहे.
सातारा हादरलं! अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून; मृतदेह नदीकाठी पुरला अन्…
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबरला रात्री अरविंद रोट याने त्याची ३० वर्षीय बायको चेतनाची हत्या केली. हत्येननंतर त्याने २९ सप्टेंबर रोजी त्याने दुकानाच्या तळघरात एक मोठा खड्डा खोदला. त्यात तनाला दफन केलं. त्यानंतर सहा दिवस त्याने ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली. पण त्यांनतर त्याचं मन खायला लागलं. त्याने 2 ऑक्टोबर रोजी चौरासी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना सर्व हकिकत सांगितली. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतलं. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी खोदकाम करून डेडबॉडी ताब्यात घेतली. यावेळी दुकानाबाहेर अख्खं गाव जमा झालं होतं.
मृतदेह बाहेर काढायचा की नाही?
घटनेची माहिती मिळताच चेतनाचे आईवडील भाऊ, बहीण सर्वच घटनास्थळी आले. पोलिसांनी या प्रकरणाची सूचना त्यांना दिले होते. त्यानंतर पोलीस आणि चेतनाच्या कुटुंबीयांमध्ये चर्चा झाली. मृतदेह बाहेर काढायचा की नाही? यावर चर्चा झाली. अनेक तास यावरून वाद सुरू होते. एकदा पुरलेला मृतदेह काढणं योग्य आहे का? यावर एकमत होत नव्हतं. यावेळी पोलीस आणि प्रशासनाने मात्र ऐकून घेण्याच्या भूमिकेत स्वत:ला ठेवलं. त्यानंतर डेप्युटी एसपी राजकुमार राजोरा यांनी घटनेचं गांभीर्य आणि खून प्रकरण असल्याने मृतदेह काढण्याचा निर्णय घेतला.
मृतदेह बाहेर काढून त्यांनतर डूंगरपूर जिल्हा रुग्णालयात मृतदेह शिफ्ट करण्यात आला. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच अरविंद रोतची कसून चौकशी केली जात आहे. हत्येमागचा त्याचा हेतू काय होता? याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
पोलीस काय म्हणाले?
सीमलवाडाचे पोलीस अधिक्षक राजकुमार राजोरा यांनी याबाबतची माहिती दिली. हा गंभीर गुन्हा असून हत्या लपवण्याचा प्रयत्न झाला होता. पण आरोपीची एक चूक पकडली गेली. आता आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. हत्येचं कारण शोधत आहोत, असं राजकुमार राजोरा यांनी सांगितलं.
Beed Crime : अत्याचाराचे आरोप केले नंतर त्याच्यासोबतच फिरायला गेली, पतीने रंगेहात पकडलं आणि…