Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telangana Crime: विकृत मानसिकतेचा कळस! मुलगाच हवा आहे म्हणत बापानेच मुलींसह पत्नीचा जीव घेतला

तेलंगणातील हनमकोंडात एका व्यक्तीने मुलगी होणार या रागातून गर्भवती पत्नी व दोन मुलींना स्विमिंग पूलमध्ये बुडवून ठार मारले. या तिहेरी हत्याकांडामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 04, 2026 | 01:41 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मुलगी होणार या कारणावरून तिहेरी हत्या
  • गर्भवती पत्नी व दोन मुलींना बुडवून मारलं
  • आरोपी फरार, पोलिसांचा तपास सुरू
तेलंगणा: तेलंगणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने आपल्या गरोदर पत्नीसह दोन निष्पाप मुलींना स्विमिंग पूलमध्ये बुडवून त्यांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीचे नाव अजहरुद्दीन असे आहे. अजहरुद्दीनने काही काळापूर्वी प्रेमविवाह केला होता, मात्र आपल्या पत्नीच्या पोटात वाढणारे बाळ हे मुलगी असल्याचे समजल्याने तो प्रचंड संतापलेला होता. या रागातून त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. ही घटना तेलंगणातील हनमकोंडा परिसरात घडली.

Bhandara: भंडाऱ्यात वाघाचा धुमाकूळ; 15 दिवसांत 2 जणांचा बळी, वाघाच्या भीतीने मुले शाळेत जाईना; गावकऱ्यांत भीती

काय घडलं नेमकं?

अजहरुद्दीनने आपल्या पत्नीवर गर्भपात करण्यासाठी वारंवार दबाव टाकला होता, परंतु त्याच्या पत्नीने या अन्यायकारक मागणीला कडाडून विरोध दर्शवला होता. पत्नीने गर्भपात करण्यास नकार दिल्यानंतर अजहरुद्दीनने या हत्या करण्याचा कट रचला. याच योजनेचा भाग म्हणून तो आपल्या कुटुंबाला घेऊन एका स्विमिंग पूलवर गेला आणि तिथे त्याने आपल्या पत्नीसह दोन्ही मुलींना पाण्यात फेकून दिले. या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. कौटुंबिक वादातून आणि लिंगभेदाच्या विकृत मानसिकतेतून एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने समाजमनातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

तेलंगणा हादरले! ऑटोचालक बापाकडून 8, 6 आणि 5 वर्षांच्या मुलींची तलावात केली बुडून हत्या; कारण काय?

तेलंगणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी आपल्याच पोटच्या तीन अल्पवयीन मुलींची निर्घृण हत्या केल्याची समोर आली आहे. रविवारी पोलिसांनी आरोपीला ऑटो-रिक्षा चालकाला अटक केली होती. त्याने आपल्या मुलींना तलावात बुडवून मारल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेने तेलंगणा हादरून गेले.

काय नेमकं प्रकरण?

6 मार्च रोजी आरोपी ऑटो चालक आणि त्याच्या पत्नीने पोलिसांत तक्रार केली, त्याच्या 8, 6 आणि 5 वर्षांच्या तीन मुली अचानक बेपत्ता झाल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तात्काळ शोधायला सुरुवात केली. मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्थानिक रहिवाशांची चौकशी केली आणि मुलींचे फोटो सोशल मिडिया आणि मेसेंजिग अॅपवर शेअर केले होते.

पोलिसांनी वडिलांची कडक चौकशी केली असता, मुलींना शेवटच्या क्षणी कुठे पहिले याची मागणी केली होती. तो त्याच्या बोलण्यावर ठाम नव्हता. पोलिसांना त्याच्या हालचालींवर संशय आला आणि तांत्रिक तपासणी आणि कठोर चौकशीनंतर त्याने गुन्हा कबूल केला.

Pune Crime: फेसबुकवरून ओळख, लग्न आणि संशय; आळंदीत चिमुकलीसह वृद्धेची निर्घृण हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्येमागील कारण काय होते?

    Ans: मुलगी होणार असल्याच्या रागातून आरोपीने हे कृत्य केले.

  • Que: किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: गर्भवती पत्नी आणि दोन मुलींचा मृत्यू झाला.

  • Que: पोलिसांची काय कारवाई सुरू आहे?

    Ans: आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करून तपास सुरू आहे.

Web Title: Telangana crime the pinnacle of perversion demanding a son a father murders his wife and daughters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
1

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
2

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
3

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
4

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.