
Air Hostess Varsha Turkar Murder Case Solved (फोटो सौजन्य-AI एआय)
अनैतिक संबंधातून पतीच्या मैत्रिणीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच १३ लाख रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार बोंडराणी जंगलातील हत्याकांडाच्या तपासातून उघडकीस आला आहे.
वर्षा धुरनलाल तुरकर (३५, रा. धानोरी, जि. पुणे पुणे) यांच्या हत्येचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार दिवसांत छडा लावला. या प्रकरणात पतीची पत्नी, सुपारीचा मध्यस्थ आणि अन्य एक अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, प्रत्यक्ष हत्येत सहभागी असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. वर्षा तुरकर ही दिवाळीच्या सुट्टीत बालाघाट जिल्ह्यातील किन्ही येथे माहेरी आल्या होती.
शनिवारी त्या मित्र नितेश अग्रवाल याच्यासोबत तिरोडा येथे गेल्या होत्या. परत येताना बोंडराणी गावाजवळील शिवमंदिर परिसरातील जंगलात थांबल्या असता दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर चाकूने वार करून हत्या केली. याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान नितेश अग्रवाल आणि वर्षा यांच्यातील प्रेमसंबंधांमुळे त्यांची पत्नी मोना अग्रवाल त्रस्त होती.
त्यातून तिने कुणाल कुंभलकर याच्या माध्यमातून शाहरुख पठाण याच्याशी संपर्क साधून १३ लाखांची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले. शाहरुखने इमरान शेख, नलेन ऊर्फ नायलान शेख आणि क्रिश राऊत यांच्यावर हत्येची जबाबदारी सोपविल्याचा संशय आहे. दोन हल्लेखोर पसार; पोलिसांकडून शोध सुरू; या प्रकरणात इमरान करीम शेख, शाहरुख पठाण, कुणाल कुंभलकर आणि मोना अग्रवाल या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. नलेन ऊर्फ नायलान शेख आणि क्रिश राऊत हे दोघे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सहा पथकांनी ही कारवाई केली. पुढील तपास दवनीवाडा पोलीस करीत आहेत.
हल्लेखोरांनी केला कारचा पाठलाग
विशेष म्हणजे, नितेश यांच्या कारमधील जीपीएस लोकेशन मिळविण्यासाठी आवश्यक असलेला टोयोटा आय-कनेक्ट अॅपचा आयडी आणि पासवर्ड मोना यांनी आरोपींना दिला होता. त्याच्या आधारे हल्लेखोरांनी कारचा पाठलाग करून बोंडराणी जंगलात वर्षा यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. घटनास्थळापासून गोंदिया, बालाघाट आणि खैरलांजी परिसरातील सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून पोलिसांनी आरोपींपर्यंत धागेदोरे जोडले.
Ans: वर्षा तुरकर यांची हत्या गोंदिया जिल्ह्यातील बोंडराणी गावाजवळील शिवमंदिर परिसरातील जंगलात झाल्याची माहिती आहे.
Ans: या प्रकरणात मोना अग्रवाल, शाहरुख पठाण, कुणाल कुंभलकर आणि इमरान करीम शेख या चौघांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. दोघे संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
Ans: पोलिसांच्या तपासानुसार, नितेश अग्रवाल यांच्या कारचे लोकेशन मिळवण्यासाठी टोयोटा आय-कनेक्ट अॅपचा आयडी आणि पासवर्ड आरोपींना देण्यात आला होता. त्याच्या आधारे कारचा माग काढल्याचा पोलिसांचा दावा आहे.