प्रसिद्ध टेनिसपटू राधिका यादवची वडिलांनी का केली हत्या? तपासात धक्कादायक कारण आलं समोर (फोटो सौजन्य-X)
Tennis Player Radhika Yadav News in Marathi : दिल्लीतील गुरुग्रामच्या सेक्टर-५७ मध्ये राज्यस्तरीय महिला टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येप्रकरणी एक नवीन खुलासा झाला आहे. एका क्षुल्लक कारणामुळे राधिकाच्या वडिलांनी तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मृत महिलेची ओळख राज्यस्तरीय टेनिस खेळाडू राधिका यादव (सुमारे २५ वर्षे) अशी झाली आहे, जी तिच्या कुटुंबासह सेक्टर-५७ येथील सुशांतलोक-२ येथे राहत होती. मृत राधिका टेनिस अकादमी चालवत होती आणि तिचे वडील (आरोपी) तिच्या टेनिस अकादमी चालवण्याच्या प्रकरणावर नाराज होते.
राधिका यादव असे मृत टेनिसपटू मुलीचे नाव आहे. तिचे वडील दीपक यादव यांनी तिला गोळ्या घालून ठार केले. राधिका तिच्या घराच्या पहिल्या मजल्यावर स्वयंपाकघरात काम करत असताना हा प्रकार घडला. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता सुशांतलोक-२, सेक्टर-५७ येथे एका महिला टेनिस खेळाडूची तिच्या वडिलांनी तीन गोळ्या झाडून हत्या केली. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की टेनिस खेळाडू अकादमी चालवत असल्याबद्दल नाराजी असल्याने वडिलांनी परवानाधारक .३२ बोअरची रिव्हॉल्वर काढली. त्याच रिव्हॉल्व्हरने तिच्या पाठीत गोळ्या झाडल्या. गंभीर अवस्थेत राधिका यादवला एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राधिकाच्या मृत्यूची चौकशी करत असताना त्यांनी दीपक यादवला तिची हत्या करण्यामागचे कारण विचारले. त्यावेळी त्यांनी धक्कादायक उत्तर दिले. यावेळी दिपक यादवने गुन्हा कबूल केला असून त्यांनी सांगितले की, अकादमी उघडल्यानंतर राधिकाचे वडील संतापले होते. त्यांनी सांगितले की, गावातील लोक मला नेहमी टोमणे मारायचे की तू तुझ्या मुलीच्या कमाईवर जगतो. मुलीच्या पैशांवर मजा करतोय, कधीपर्यंत मुलीच्या कमाईवर जगणार, असे टोमणे त्याला सतत ऐकायला मिळायचे. गेल्या १५ दिवसांपासून टेनिस अकादमीवरून वडील आणि मुलीमध्ये भांडण सुरू होते.
टेनिसपटूला गोळी लागल्याची माहिती मिळताच, सेक्टर-५६ पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस उपायुक्त (पूर्व), एफएसएल, गुन्हे दृश्य आणि फिंगरप्रिंट पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी ज्या घरातून गोळी झाडली त्या घरातून पुरावे गोळा केले. मृताचा मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात ठेवण्यात आला. पोलिस तपासात असे दिसून आले की राधिकाने टेनिसमध्येही अनेक पदके जिंकली आहेत. काही महिन्यांपूर्वी राधिकाने खांद्याला दुखापत झाल्यामुळे टेनिस खेळणे बंद केले होते. त्यानंतर राधिकाने वझिराबाद गावात मुलांना टेनिस शिकवण्यासाठी एक अकादमी सुरू केली होती, परंतु राधिकाचे वडील दीपक हे अकादमी उघडण्यास विरोध करत होते.
मुलीचे कमाई खाण्याच्या प्रकरणावरून संताप व्यक्त करण्यात आला. पोलिस प्रवक्ते संदीप कुमार म्हणाले की, मुलीला गोळी लागल्याची माहिती पोलिसांना एका खाजगी रुग्णालयातून मिळाल्यावर सेक्टर-५६ पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृत खेळाडू राधिकाचे वडील दीपक यांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून परवानाधारक रिव्हॉल्व्हर जप्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात समोर येणाऱ्या तथ्यांनुसार पुढील कारवाई केली जाईल.