crime (फोटो सौजन्य: social media)
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात धाब्यावर जेवणासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. शहरातील सिल्लोड रोडवरील काल (२४ जुन) मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की यात तीन जण जागीच ठार झालेय. तर दोन जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. कार भरधाव वेगात असल्याने आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला जाऊन धडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सेवानिवृत्तीच्या एक महिन्याआधीच तलाठ्याला लाच घेताना अटक; बुलढाण्यात खळबळ
पुढे आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर- जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील बिल्डा फाट्याजवळ मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास भरधाव कारने पुलावरील दुभाजकाला धडकल्याने तिघेजण जागीच ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. हे सर्व पाचही मित्र एका धाब्यावर जेवणासाठी फुलंब्रीला गेले होते. परत येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. भरधाव कार डिव्हायडरला जाऊन धडकल्याने कारमधील तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमी तरुणांना नाना घाटामध्ये दाखल करण्यात आले आहे. कारमध्ये असणारे तरुण सगळे १५ ते १८ वर्षांचे होते. सध्या पोलीस या अपघाताचा तपास करत आहे.
माझा भाऊ डॉन, तो डायरेक्ट मर्डर करतो,दारू पिऊन तरुणींचा रस्त्यावर धिंगाणा….
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील महावीर चौकात दोन मद्यधुंद तरुणींनी धिंगाणा घातल्याचे समोर आले आहे. ‘आपला भाऊ डॉन आहे, तो डायरेक्ट मर्डर करतो’ पोलीस आपले काहीही करू शकणार नाही अशी धमकी सुद्धा त्या मुलींनी नागरिकांना दिली असल्याचे समोर आले आहे. त्या तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.
दोन मद्यधुंद तरुणींनी भररस्त्यात धिंगाणा घातला. तसेच रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्या दोघींनी शिवीगाळ करत त्रास दिला. ही घटना वाळूजमधील महावीर चौकांमध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे.
व्हिडिओत काय?
‘आम्हाला पोलिस काहीही करू शकत नाहीत. आम्ही मोठ्या घरातील आहोत. टेन्शनमुळे दारू प्यायली आहे’ असं त्या दोघी व्हिडिओत म्हणतांना दिसत आहे. तसेच माझा भाऊ हा डॉन आहे. तो हाफ नाही तर डायरेक्ट फुल मर्डर करतो असं म्हणत त्यातील एका तरुणीने जमलेल्या लोकांना धमकीही दिली. जमावाने या दोन्ही तरुणींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी शिवीगाळ करत अरेरावीचा सूर कायम ठेवला. त्या तरुणींना रस्त्यावरून धड चालताही येत नव्हतं. त्या पुढे जैन रस्त्याच्या कडेला बसल्या. घडलेल्या या प्रकारचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
केवळ 2 हजार रुपयांसाठी कामगाराने जाळले मालकाचे दोन ट्रक; आधी दारू प्यायला अन् नंतर…