बुलढाणा जिल्ह्यात एका तलाठ्यासह महसूल कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे. रावसाहेब काकडे असे तलाठ्यांच्या नाव आहे. त्यांची पुढच्या महिन्यात सेवानिवृत्ती होणार होते. मात्र त्यापूर्वीच एसीबीने अटक केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
क्षुल्लक कारणावरून दोन वाहनचालकांमध्ये झाला वाद; एकाने चाकू काढला अन्…
काय आहे प्रकरण?
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तहसील कार्यालयात वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना तलाठी व महसूल सहाय्यक असं दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे तलाठी एका महिन्यात सेवा निवृत्त होणार होते. एसीबीने रंगेहात धाड टाकत तलाठ्याला अटक केली आहे आणि लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, शासकीय सेवेतील इतर भत्ते आणि सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यापासून हे तलाठी वंचित राहू शकतात. तलाठी एका शेतकऱ्याकडून ७ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तलाठ्याने नाव रावसाहेब काकडे व महसूल सहाय्यक मनोज झिने अशी लाचखोरांची नावे आहे.
श्रीगोंदातील तलाठी आणि जुन्नरच्या अल्पवयीन मुलीचा दरीत आढळला मृतदेह
पुणे: पुण्याच्या जुन्नरमध्ये तलाठी आणि मुलीचा मृतदेह दरीत आढळला आहे. आंबे-हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून या दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचा अंदाज आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.
मृतकाचे नाव रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) असे आहे. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. जुन्नरच्या आंबोली येथील मुलीचा नाव रुपाली असे आहे. मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलगी ही अल्पवयीन असल्याचे बोलले जात आहे. ती रामचंद्र यांची नात्यातील होती. हे दोघे गेल्या आठवड्याभरापासून गायब होते.रामचंद्र यांची गाडी तीन- चार दिवसांपासून जुन्नरमधील कोकण कड्यावर उभी असल्याचे, तसेच तिथंच पायातील चपला जोड आढळून आले होते. याने ग्रामस्थांचा संशय बळावला होता. त्यानुसार कोकण कडयाच्या खोल दरीत शोध घेण्यात आला. त्यात सुमारे बाराशे फुटावर मृतदेह आढळले. याबाबत जुन्नर पोलिसांना कळविण्यात आले.
नाशिक हादरलं! आधी पोलीस शिपायाने सहा वर्षाच्या मुलीला गळफास लावला, नंतर स्वतःही….