Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: पंजाबच्या रिक्षाचालकावर भाळली ‘बिझनेसमन’ पत्नी; 3.30 लाखांचा ऐवज घेऊन फरार; गुन्हा दाखल

ठाण्यातील महिलेने अमृतसरमध्ये ओळख झालेल्या रिक्षाचालकाशी संबंध ठेवत मुलासह घर सोडले. जाताना 3.30 लाखांचा ऐवज नेल्याचा आरोप असून कापुरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 05, 2026 | 01:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पर्यटनादरम्यान रिक्षाचालकाशी ओळख
  • महिलेने मुलासह घर सोडले, ऐवज नेल्याचा आरोप
  • पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू
ठाणे: पर्यटनासाठी पंजाबला गेलेले ठाण्यातील एका व्यावसायिकाचे कुटुंब एका अनपेक्षित वळणामुळे विखुरले गेले आहे. अमृतसरमधील एका रिक्षाचालकाच्या प्रेमात पडलेल्या पत्नीने, आपल्या मुलासह आणि आईंसह घर सोडून थेट पंजाब गाठले. जाताना घरातील सुमारे ३.३० लाख रुपयांचा मुद्देमालही लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ठाण्याच्या कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील ढोकाळी परिसरात राहणारे ४५ वर्षीय तक्रारदार यांचा कपड्यांचा ट्रेडिंग आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. डिसेंबर २०२३ मध्ये ते आपल्या पत्नी, मुलगा आणि सासूसह अमृतसर येथे पर्यटनासाठी गेले होते. या सहलीदरम्यान त्यांची ओळख स्थानिक रिक्षाचालक हरविंदर सिंग याच्याशी झाली. सहल संपवून सर्वजण ठाण्यात परतले आणि काही दिवस संसार सुरळीत सुरू होता.

Chandrapur Crime: चंद्रपुरात थरारक खून! २२ वर्षीय तरुणाने केली प्रेयसीची हत्या; आधी केला आत्महत्येचा बनाव मात्र…

१० जानेवारी २०२६ रोजी सकाळी तक्रारदार यांना त्यांची पत्नी, मुलगा आणि सासू घरात नसल्याचे आढळून आले. सुरुवातीला याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी तपास केला असता, तक्रारदार यांची पत्नी अमृतसर येथे हरविंदर सिंग याच्यासोबत आपल्या स्वेच्छेने राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मिसिंगची नोंद बंद केली.

तिने कपाट साफ करून पळवले दागिने, पैसे

अमृतसरला जाऊन पत्नीचा शोध घेतल्यानंतर तक्रारदार जेव्हा घरी परतले, तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. घरातील कपाटाची तपासणी केली असता रोख १.३० लाख रुपये, ७५ हजारांची सोन्याची चेन आणि २५ हजारांची अंगठी आणि १ लाख रुपये किमतीचे रेडिमेड कपडे असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज पत्नीने सोबत नेल्याचा आरोप पतीने तक्रारीत केला आहे.

या तक्रारीनंतर कापुरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या प्रकरणाचा तांत्रिक आणि कायदेशीर पैलू पडताळून पाहत आहे. एका सहलीतून सुरू झालेली ओळख एका सुखी संसाराला असा सुरुंग लावेल, याची कल्पनाही तक्रारदाराने केली नव्हती.

Raigad Crime: एका भीतीने घेतला जीव! घरच्यांनी फेसबुकवरच्या मित्राशी बोलतांना पकडले आणि… १५ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिला कुठे गेली?

    Ans: ती अमृतसरमध्ये रिक्षाचालकाशी राहत असल्याचे समोर आले.

  • Que: किती ऐवज नेल्याचा आरोप आहे?

    Ans: सुमारे 3.30 लाख रुपयांचा ऐवज नेल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

Web Title: Thane crime businessmans wife falls for rickshaw driver from punjab flees with valuables worth 330 lakhs case registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुःखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन
2

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुःखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन

Thane Metro News: ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा; गायमुख-कापूरबावडी मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट
3

Thane Metro News: ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा; गायमुख-कापूरबावडी मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.